आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत:शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे, मंदिर उभारल्याने कोरोना बरा होणार नाही; त्यासाठी डॉक्टर्स हवेत : उद्धव ठाकरे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या व्यक्तव्यावर देखील भाष्य केले. शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे. राम मंदिर उभारल्याने कोरोना बरा होणार नाही. कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला डॉक्टर्सची आवश्यकता आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत अयोध्येत जे राममंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स हवेत? असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला होता.

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बरोबर आहे. डॉक्टर्स हवेतच. आपण ज्या सुविधा निर्माण करतो आहोत या सुविधा रुग्ण बरा करणार नाहीयत. या सुविधांच्या बरोबर डॉक्टर्स पाहिजेत. मी आधीच जे म्हटलं होतं की, जंबो फॅसिलिटी हवी. म्हणजे आम्ही काय बेडचं दुकान नाही काढलेलं. फर्निचरचं दुकान नाही काढलं. प्रदर्शन नाही भरवलं. या बेडवर जेव्हा रुग्ण येईल तेव्हा त्या रुग्णाच्या बेडच्या बाजूला डॉक्टर आणि सिस्टर पाहिजे आणि हातात औषधं पाहिजेत.' अशी प्रतिक्रिया दिली आहे.