आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेनेला थांबवणारा ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला आलेला नाही, अशाप्रकारे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राणे कुटुंबीयांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर राजापुर तालुक्यातील साखरकुंभे गावात दाखल झाले आहे. याठिकाणी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले आहे. ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी नारायण राणेंनी पाय ठेवून दाखवा असे आव्हान केले होते. या आव्हानाचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे.
ठाकरेंचे कोकणाशी जिव्हाळ्याचे संबंध
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधकांशी चर्चा करतील. राणे म्हणाले होते ठाकरेंना याठिकाणी येऊ देणार नाही. येऊ देणार नाही म्हणजे काय? ठाकरे परिवार आणि कोकणचे जिव्हाळ्याचे नाते आहे. जेव्हा जेव्हा कोकणावर आघात झालेला आहे तेव्हा तेव्हा शिवसेना त्यांच्या मदतीला धावली आहे.
देशात लोकशाही
संजय राऊत म्हणाले, शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. ज्यांची तिकडे गुंतवणूक आहे त्यांनीच उद्धव ठाकरेंना येऊ देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र शिवसेनेला थांबवणारा आणि ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला यायचाय. त्यामुळे पोकळ धमक्या देणे बंद करा. या देशात लोकशाही आहे. राणे कुटुंबीय पाय ठेवू देणार नाही, असे म्हणाले होते. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागताला यायला हवे होते.
शरद पवारांचे नेतृत्व हवे
संजय राऊत म्हणाले, बारसूतल्या लोकांना रोजगाराचे अमिष तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार याठिकाणी सरकार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बोलताना राऊत म्हणाले, राष्ट्रवादीत घडलेल्या गोष्टीला शक्तीप्रदर्शन म्हणता येणार नाही. शरद पवार त्यांच्या पक्षाचे संस्थापक आहेत. वर्षानुलवर्षे लोक त्यांच्यासोबत काम करत आहेत. तसेच 2024 च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाकडे शरद पवारांसारखे नेतृत्व हवे आहे. असाही पुनरुच्चार शरद पवारांनी केला.
संबंधित वृत्त
आरोपांच्या झडणार फैरी:उद्धव ठाकरे सोलगावकडे रवाना, रिफायनरी विरोधकांची घेणार भेट; समर्थकही भेटून संमतीपत्रे सादर करणार
उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या याठिकाणी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.