आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत ''चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत'' अशी प्रतिक्रिया दिली. तर यावर भाजपने प्रतिक्रीया दिली असून ''राऊत साहेब चोराला चोर म्हणणे गुन्हा ठरला आहे. या आपल्या वाक्यांचा अर्थ ओबीसी समाजाला आपणही म्हणजे उद्धव ठाकरे व संजय राऊत चोर समजतात का?'' असा सवाल विचारला आहे.
चोराला चोर म्हणणे गुन्हा ठरला
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रीया संजय राऊत यांनी ट्विट केली. याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ''राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली.
हे लोकशाहीचे सरळ हत्याकांड
संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रीयेत पुढे म्हटले गेले की, लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल.
ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजपचे टीकास्त्र
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रीया ट्विट करणाऱ्या संजय राऊत यांना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सवाल विचारत टीका केली. ते म्हणाले, ''राऊत साहेब चोराला चोर म्हणणे गुन्हा ठरला आहे या आपल्या वाक्यांचा अर्थ ओबीसी समाजाला आपणही म्हणजे उद्धव ठाकरे व संजय राऊत चोर समजतात का? कारण यांनी सर्व मोदी चोर असं विधान केल आहे, म्हणून त्यांना शिक्षा झाली. त्याच समर्थन आपण करत आहात. ओबीसी समाजाचा अपमान आपण करत आहात.
काय आहे मानहाणी प्रकरण?
मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केली होती. केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांंधी होते.
सुरत न्यायालयाकडून शिक्षा
याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं ही मोठी कारवाई केली आहे. नंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.