आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंची सभा:माझ्यावर टीका केल्याशिवाय काही जणांना भाकरच मिळत नाही, उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

महाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारसू दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. बारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर आता महाडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

LIVE UPDATE

  • भाजपा मेहबूबा मुफ्तींसोबत गेले तेव्हा त्यांनी काय सोडले होते. मोहन भागवत मशीदीत गेले तेव्हा त्यांनी काय सोडले होते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे.
  • महाडमध्ये भगवा फडकला पाहिजेच पण भगव्याचे महत्त्व समजून घ्या.
  • लालूप्रसाद यांची सून बेशुद्ध पडेपर्यंत त्यांनी चौकशी केली, हे त्यांचे हिंदु्त्व आहे काय
  • निवडणुकीनंतर या भ्रष्ट सरकारसोबत भाजपा सत्तेत बसली आहे.
  • देशातील सर्वात भ्रष्ट सरकार मेघालयात आहे, असे अमित शहा म्हणाले होते.
  • भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असे नाव त्यांनी करावे.
  • मी हिंदुत्व सोडले असा आरोप करता, पण एकदा हिंदुत्व म्हणजे काय ते समजून घ्या. भाजपचे हिंदुत्व म्हणजे गोमूत्रधारी आहे. आपली सभा झाल्यावर आपल्या सभेच्या ठिकाणी येत ते गोमूत्र शिंपडतात.
  • बारसूमधले सर्वजण माझे नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी मी लढतोय. माझ्याकडचे सगळे काढून घेतले, तरीही आता तुम्हांला माझी भीती का वाटते असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.
  • शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे केली.
  • काँग्रेस तुम्हाला शिव्या देते, त्या तुम्ही मोजता. पण जे त्यांचे टिनपाट आहेत, ते जी टीका करतात, त्यांचे काय करायचे
  • सत्यपाल मलीक यांच्या चौकशीसाठी सीबीआय जाऊन आली. कदाचित त्यांनाही आत टाकतील. त्यांना प्रश्न विचारायचे नाही.
  • आपल्या देशातील सैनिकांचा उपयोग भाजप प्रचारासाठी करत आहे.
  • द्वेषाचे राजकारण करायचे. हिंदू-मुसलमान यासारखे मुद्दे मांडत निवडणुकांमध्ये उतरत आहेत.
  • तुमचे सोन्यासारखे मत त्यांना देतात, मात्र तुमची फसवणूक होत आहे.तसेच कोणी प्रश्न विचारल्यावर त्यांना देशद्रोही ठरवत तुरुंगात टाकायचे, हेच भाजपचे काम सुरू आहे.
  • मतदान करताना बजरंगबली की जय म्हणत मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान करत आहे. हा धार्मिक प्रचार नाही काय.
  • भाजपने 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली आहेत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला आला आहात, तमचे काय करायचे ते सांगा.
  • माझ्यावर टीका केल्याने कुणाला जर दोन घास मिळत असेल तर हे थोडके नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबियांवर टीकास्त्र डागले आहे.
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती उचापती लोकांची आहे, असे ते म्हणाले.
  • मी मुख्यमंत्री म्हणून अयोग्य होतो म्हणून तुम्ही गद्दारी केली, मग येथील गावकऱ्यांना घरे का मिळाली नाही.
  • गद्दार सत्तेवर आल्यावर हे काम थांबले. अनेक घरांचे कामही सुरू करण्यात आलेले नाही.
  • तळये गावात दरड कोसळली होती. या गावच्या पुनर्वसनासाठी आपण काम केले होते.
  • ते खोके घऊन मोकळे झाले आहे. मात्र, कोकणच्या निसर्गाची हानी का करत आहात.
  • प्रकल्प आणायचा असेल तर जनतेला का विश्वासाता घेतले जात नाही.
  • जूलूम, दडपशाही सुरू आहे. पत्रकारांना रोखण्यात येत आहे.
  • तेथील स्थानिकांच्या मुंजुरीशिवाय आपण हा प्रकल्प होऊ देणार नाही.
  • भरत गोगावले यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला का? जगताप कुटुंबियांचा पक्ष प्रवेश
  • ते खोके घऊन मोकळे झाले आहे. मात्र, कोकणच्या निसर्गाची हानी का करत आहात.
  • प्रकल्प आणायचा असेल तर जनतेला का विश्वासाता घेतले जात नाही.
  • जूलूम, दडपशाही सुरू आहे. पत्रकारांना रोखण्यात येत आहे.
  • तेथील स्थानिकांच्या मुंजुरीशिवाय आपण हा प्रकल्प होऊ देणार नाही.
  • प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या का चालवता, हा प्रकल्प हिताचा आहे, ते जनतेला पटवून द्या.
  • माझ्याकडे सत्ता नसताना माणसे आपल्याकडे येत आहे., भाजपने आपली माणसे चोरली चिन्ह चोरले आणि त्या लोकांच्या माथ्यावर मारले आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. मी काँग्रेस फोडत नाही, आपली काही लोक काँग्रेसमधून आमदार झाला. आता आपण मविआ म्हणून एकत्र लढत आहोत. म्हणून सर्वांना सोबत घेऊन लढतो आहे.
  • आमच्याकडचे कािर लोक गेली असली तरी समारेर असलेली गर्दी मात्र, दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भगव्याला डाग लावण्याची कुणाची हिंमत नाही, आम्ही गद्दारांना इथेच गाडणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
  • संपूर्ण गद्दार विकले गेले आहेत, जागा उपऱ्यांनी घेतल्या आहेत. मी बारसूची जागा सूचवली होती. प्रकल्प मोठा आहे, असे म्हणत गद्दार माझ्याकडे येत होते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
  • जितका बारसूत पोलिस बंदोबस्त लावला आहे. तितका जर चीनच्या भूमीवर लागला असता तर चीनकडून भूमिवर ताबा संगितला गेला नसता तिथे मात्र सरकारकडून काही करत नाहीये.
  • काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही. एक समाधान आहे, माझ्यावर आरोप केल्याने भाकरी मिळते हेही नसे थोडकं, आज जगताप कुटुंब आपल्यासोबत आले आहेत. मी सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. मी असं म्हणत होतो की, मातोश्रीत प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि महाडमध्ये सभा घेऊ. पण ऐकतील ते जगताप कुटुंबिय कसले? त्यांनी हट्टच धरला. इथेच या ऐतिहासिक मैदानात सभा घेणार म्हणून इथे आलो.
  • स्नेहल ताई आणि जगताप कुटुंबिय काँग्रेसमधून आल्या. काही जणांच्या भुवया उंचावल्या. काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला. तसं आपण काही करत नाही आहोत. आपण त्यांना काहीही न देता ते आपल्याकडे आले आहेत.मला नेहमनी आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं, सत्तेकडे सगळे जातात. आज तर माझ्याकडे सत्ता नाहीय.
  • आपल्या सभेला आता मैदाने अपुरे पडत आहेत.
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
  • या सभेनंतर शिवसेनेची घोडदौड राज्यभर सुरू होणार आहे.
  • जनतेने आपल्याला नगराध्यक्ष बनण्याची संधी दिली. आपण आश्वासनांपैकी 90 टक्के कामे पूर्ण केली आहेत.
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत स्नेहल जगताप यांचा समर्थकांसह पक्षात प्रवेश
  • फितुरांना पुढच्या निवडणुकीत टकमक टोक दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही.
  • रायगड जिल्ह्यात दुर्दैवाने तीन गद्दार निघाले, हा कलंक आपल्याला पुसायचा आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि संविधानाचे पूजन
  • बारसूमध्ये प्रकल्प जाहीर झाल्यावर परप्रातीयांकडून झालेले जमीनीचे व्यवहार रद्द करण्यात यावे.
  • पर्यावरणाची हानी करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही.

नीतेश राणेंची टीका

पंतप्रधान मोदी मनकी बात करतात तर उद्धव ठाकरेंना केवळ धन की बात समजते. कोकणात ते कोकणवासियांसाठी नव्हे तर स्वतःच्या घराची चूल पेटवण्यासाठी आले आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत, अशाप्रकारची सणसणीत टीका भाजप नेते नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.