आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांची प्रतिक्रिया:संजय राउत म्हणाले- उद्धव ठाकरेंकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता; महाराष्ट्रातील कुणी पंतप्रधान झाल्यास मला आनंदच -शरद पवार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची देशाला गरज

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शदर पवार यांनी टिप्पणी केली आहे. जर महाराष्ट्र राज्यातून कोणी पंतप्रधान होत असेल तर मला अतिशय आंनद होईल असे पवार यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यातील राजकारणात चर्चेला उधान आले आहे. राऊत यांनी मंगळवारी सकाळी आपल्या ट्विटर खात्यावरुन एक व्हिडिओ ट्विट करुन लिहिले होते की, "अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. तो दिवस लवकरच उगवेल.. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!"

व्हिडिओत काय आहे?
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पलीकडे आणि त्याही पलीकडे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता कुणी... आता जरी कुणी आम्हाला इंद्राची जागा दिली तरी आम्हाला ती नको आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक शिवसेनेचा शिवसैनिक बसलेला आहे असे राऊत म्हणत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची देशाला गरज
या ट्विटनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटते की प्रत्येकजण आपल्या कुटुंबाचा प्रमुख आहे. हे त्यांच्या नेतृत्त्वाचे यश आहे. देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज असून ते येत्या काळात देशाचे नेतृत्व करेल अशी माझी इच्छा आहे."

बातम्या आणखी आहेत...