आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय वादळादरम्यान बैठकांचे सत्र:फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट, म्हणाले - 'या सर्व गोष्टींमध्ये काँग्रेसचा हिस्सा किती?'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात BJP चे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यांरींची भेट घेतली.

अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, मुंबई पोलिसचे माजी कमिश्नर परिमबीर सिंह यांच्या 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आणि ट्रान्सफरच्या नावावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आहे. परमबीर सिंह, ट्रान्सफर वाद आणि सचिन वाझेंच्या प्रकरणात भाजप नेत्यांनी राज्यपालांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

राज्यात अस्थिरतेचे वातावरण : फडणवीस
राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. आम्ही 100 पेक्षा जास्त विविध मुद्द्यांवर राज्यपालांशी चर्चा केली आहे. ज्यामध्ये सचिन वाझे, ट्रान्सफर पोस्टिंग, कोरोनाची सध्याची स्थिती आणि राज्य सरकारच्या अपयशाचा समावेश आहे. आम्हाला वाटते की, राज्यपालांना आम्ही जे काही सांगितले आहे, त्याचे उत्तर सरकारने द्यावे. पोलिसांचा वापर पैसा वसुलीसाठी केला जात आहे. ज्या अधिकाऱ्यांना ट्रान्सफरच्या बहाण्याने धमकावले जात आहे, त्यांना सुरक्षा देण्यात यावी.

फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांत ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या अतिशय चिंताजनक आहेत. मुख्यमंत्र्यांचे मौनदेखील या घटनांवर प्रश्नचिन्ह आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषद घेतल्या आहेत पण दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी मंत्री आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आता महावसुली आधारित सरकार बनले आहे. आता जनतेला न्याय मिळवून देणे फार महत्वाचे आहे. कॉंग्रेसचा कोणताही चेहरा उरलेला नाही, कोणतेही धोरण शिल्लक राहिलेले नाही. जे काही विषय समोर येत आहेत ते हे सिद्ध करतात की हे सरकार सत्तेत राहण्यासाठी काहीही करणार आहे. या सर्व प्रकारात काँग्रेसला किती हिस्सा मिळत आहे असा माझा सवाल आहे. आम्ही राज्यपालांना या सर्व बाबींसंदर्भात चौकशी करण्यास सांगितले आहे.

जी मूळ घटना आहे, त्याचे सत्य समोर यावे : फडणवीस
माजी मुख्यमंत्री म्हणाले की, अँटिलिया प्रकरण, जी मूळ घटना आहे, त्याचे सत्य समोर यायला हवे. मात्र जे हे ट्रान्सफरचे रॅकेट आहे, हफ्ता वसूलीचे प्रकरण आहे, त्याचा तपास तुम्ही रोखू शकत नाही. एवढे मोठे रॅकेट समोर आणणाऱ्यावर तर कारवाई करण्यात आली. मात्र ज्यांनी यामध्ये भूमिका निभावली त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही.

आघाडी सरकारची बैठक

दरम्यान महाराष्ट्र कॅबिनेटची एक मोठी बैठक आज मुंबईत होणार आहे. दरम्यान मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाउसमध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचे कारण कोरोनाची वाढती प्रकरणे असे सांगितण्यात आले आहे. मात्र सूत्रांनुसार, या बैठकीमध्ये राज्यातील घडामोडींवर चर्चा होऊ शकते.

सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये मंथन सुरू

या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांनी माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या घरी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास दोन तासांच्या या बैठकीमध्ये सध्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र यामध्ये काँग्रेसचे नेते दोन गटांमध्ये विभागले गेले. एक गट सरकार आणि NCP सोबत उभे असल्याचे म्हणत होता. तर दुसरा गट हा या प्रकरणापासून स्वतःला वेगळे राहा म्हणत सर्व काही मुख्यमंत्री आणि शरद पवारांवर सोडून द्यावे असे म्हणत होता. दरम्यान जास्त नेते हे सरकारच्या या अवस्थेवर नाराज असल्याचे दिसले. त्यांची ही नाराजी आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्येही दिसून येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...