आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधंगेकरांच्या विजयाने जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाची आठवण झाली. विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. जनतेच्या मताचा बुलडोझर हुकुमशाहीविरोधात फिरवण्याची गरज आता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, सखा पाटील या मातब्बर उमेदवाराला त्यावेळी नवखा माणूस असलेल्या जॉर्ज फर्नांडिसने हरवले. पुण्यातील कसब्यात 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला भुईसपाट झाला. त्यामुळे विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. रविंद्र धंगेकर यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
मी स्वप्नात रमणारा नाही
पंतप्रधान पदाबाबतच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला. ते म्हणाले, मी स्वप्नात रमणारा नाही. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यावेळी माझ्यावर कशाप्रकारे आली. ते मी त्यावेळी सांगितले आहे. मात्र माझी अशी कुठलीही स्वप्न नाहीत. देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सामान्य लोकांनी घ्यायला हवे.
त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सूड भावनेतून आमच्यासोबत राहिलेल्या अनिल परब, नितीन देशमुख यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत. सूडाने पेटून तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. मेघालयात मोदी आणि शहांनी वाईट प्रचार केला. आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. 4 दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. आम्ही आता तुमच्या पक्षात यावे ही तुमची अपेक्षा आहे का? तुमच्या पक्षात आलेल्यांवरिल आरोप कशाप्रकारे बंद करण्यात आले. हे दिसून येते.
शेतकऱ्यांना आधार द्या
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, जनतेच्या हिताचे प्रश्न ऐरणीवर येऊ दिले जात नाहीत. आता प्रश्न पुढे यायला लागले की नवीन वाद समोर येतो. गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पावसाचा शाप आपल्याला लागला आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. तो पिकवेल तरच आपण खाऊ, त्यामुळे राज्यकर्त्यांनी तो स्वार्थी विचार करुन तरी लवकरात लवकर मदत जाहीर करावी. कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना आधार द्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरायला आम्ही आहोतच.
स्मृती स्थळावर दर्शन
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. रवींद्र धंगेकर आज राज ठाकरे, अजित पवारांची भेट घेणार आहे. उद्या रवींद्र धंगेकर यांचा शपथविधी होणार आहे. आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन ते दर्शन घेतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.