आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Uddhav Thackeray Government Order Update : Needy Patients Will Get Free Blood In Government Hospitals From 12 December, The State Government Has Issued An Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णांना दिलासा:आजपासून गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत रक्त मिळणार, राज्य सरकारने जारी केले आदेश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र कोरोना प्रभावित राज्य असतानाही राज्य सरकारने हा आदेश जारी केला

आरोग्य विभागाने शनिवारपासून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोविडमुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांपैकी एक राज्य असताना राज्य सरकारने हा आदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, राज्यात कोरोनाचे 74 हजार 408 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले की, 12 डिसेंबरपासून राज्यातील रुग्णालयात मोफत रक्त पुरवले जाईल. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. टोपे यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण फाउंडेशन येथे रक्तदान करण्याचे आवाहन केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser