आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत सेवालाल महाराजांचे वंशज ठाकरे गटात:उद्धव ठाकरेंच्या उपस्थित अनिल राठोड यांनी हाती बांधले शिवबंधन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज (पोहरादेवी) आणि माजी आमदार गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल राठोड (माजी विज मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य) यांनी आज शिवबंधन हाती बांधले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

म्हणून पक्षप्रवेश

संजय राठोड यांनी शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी तसेच संजय राठोड पक्षातून गेल्यामुळे शिवसेनेचे नुकसान टाळण्यासाठीही शिवसेनेने हा पर्याय निवडला असून संत सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांना जवळ केले आहे असे बोलले जाते.

शिंदे - भाजप सरकारवर हल्लाबोल

ठाकरेंनी शिंदे - भाजप सरकारवर हल्ला चढवला. नियोजित महाराष्ट्रभवन करणार अशी घोषणा झाली पुढे त्याचे काय? असा सवाल ठाकरेंनी विचारला. कर्नाटकातून आलेल्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीच बोलले नाही यावरही ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केले. मी स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेत नाही. जनतेच्या हितासाठी निर्णय घेतो असे ते यावेळी म्हणाले.

सर्व काही इगोसाठी

आरेमध्ये कारशेडची गरज नव्हती, ते कांजूरमध्येही होऊ शकले असते असे ठाकरे म्हणाले. सर्व प्रकार इगोसाठी सुरू असल्याचा ठपकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ठेवला. राज्यपाल हे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी असतात. त्यांना दुत म्हणतात, राज्यपालांची नियुक्ती कोणत्या निकषावर केली पाहिजे हे ठरवावे लागेल. बिनडोक माणूस राज्यपाल नको अशा शब्दात ठाकरेंनी संतापही व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...