आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र:राज्यापालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी कॅबिनेटने घेतला निर्णय

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे रद्द झाल्या महाराष्ट्रातील 9 विधान परिषदेच्या निवडणुका

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात संविधानिक संकटापासून वाचण्यासाठी गुरुवारी कॅबिनेटने मोठा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, कोरोनामुळे सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार आहे. 

यामुळे घेतला निर्णय
गुरुवारी झालेल्या कॅबिनेटचे बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील कोणत्याच सदनाचे सदस्य नाही. तसेच, आतापर्यंत त्यांनी कोणतीच निवडणूक लढवली नाही. आता कोरोनामुळे सध्या राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. यामुळे आता मुख्यमंत्र्यांसमोर आपले पद वाचवण्याचे संकट उभे ठाकले आहे.

28 मे पूर्वी कोणत्याही सदनाचा सदस्य होणे बंधनकारक
उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर, 2019 ला महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. संविधानतील कलम 164 (4) नुसार उद्धव ठाकरेंना 6 महिन्याच्या आत राज्यतील कोणत्याही सदनाचा सदस्य होणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपले पद वाचवण्यासाठी 28 मे पूर्वी आमदार होणे गरजेचे आहे.

15 दिवस आधीच निवडणूक आयोगाला जारी करावी लागेल अधिसूचना
विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक आयोगाला 15 दिवस आधीच अधिसूचना जारी करावी लागेल. महाराष्ट्राती विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला संपत आहे. या 9 विधान परिषद जागांसाठी निवडणुका होणार होत्या. पण, आता कोरोनामुळे या निवडणुका काही काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत आठ वेळेस निवडणूक न लढलेल्या व्यक्तींनी भूषविले मुख्यमंत्रिपद
राज्यात विधानसभा किंवा परिषदेचे सदस्यत्व नसताना मुख्यमंत्री बनणाच्या यादीत उद्धव ठाकरे आठवे आहेत. त्यांच्यापुर्वी काँग्रेस नेते ए. आर अंतुले, वसंतदादा पाटिल, शिवाजीराव निलंगेकर-पाटिल, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण  यांनी कोणत्याही सदनाचे सदस्यत्व नसताना मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.

बातम्या आणखी आहेत...