आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Uddhav Thackeray Maharashtra Govt Bans Patanjali Ayurveda Coronil : Medicine Home Minister Anil Dekhmukh Says Sale Of Counterfeit Drugs Is Not Allowed In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधावर बंदी:रामदेव बाबांच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी, गृहमंत्री म्हणतात - महाराष्ट्रात बनावट औषधांच्या विक्रीला परवानगी नाही

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई | योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर कोरोनिल हे औषध तयार केले. मात्र या औषधाची विक्री आता अडचणीत सापडली आहे. कारण आयुष मंत्रालयाने जाहिराती थांबवल्यानंतर आधी राजस्थान, मग आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन याविषय़ी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात नकली औषधांच्या विक्रीला परवानगी नाही या थेट शब्दात त्यांनी थेट रामदेव बाबांना इशारा दिला आहे.

गृहमंत्री अनिल देशमूख म्हणाले की, कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणीविषयी अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. याच कारणामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. पुढे ते म्हणाले की, 'नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूरद्वारे पतंजलीने कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणी करुन घेतली होती की नाही याबाबत माहिती घेईल. आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देतो की आमचं सरकार महाराष्ट्रात नकली किंवा बनावट औषधांच्या विक्रीला परवानगी देणार नाही.

बातम्या आणखी आहेत...