आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपविरोधातील लोकांना ईडीसह अनेक नोटीस पाठवून त्यांना भीती घालत भाजपमध्ये प्रवेश करायला लावणाऱ्या दबावाला आपण बळी पडणार नाही, असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस पाठविली आहे. यात गेल्या 20 वर्षांमधील माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आली होती. ही माहिती देण्यासाठी वैभव नाईक् आज एसीबी कर्यालयात हजर झाले, आणि त्यांनी एसीबीला सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. वैभव नाईक म्हणाले की, गेल्या 20 वर्षांतील माहिती एसीबीकडून मागवण्यात आली होती. ही सर्व माहिती देण्यासाठी मी इथे आलो, भावना गवळी, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक हे जसे दबावाला बळी पडून शिवसेनेला सोेडून गेले तसे जाणार नाही सगळ्या गोष्टीला तोंड देऊ असे सांगतानाच भाजपच्या दबावाला भीक घालणार नाही असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे. माझ्यासह पत्नीला आणि भावालाही नोटीस देण्यात आली आहे. मात्र ही नोटीस देण्यात आली असली तरी आम्ही पोलिसांना सर्व माहिती देऊन सहकार्य करणारच आहोत, मात्र भाजपच्या दबावाल बळी पडणार नाही अशी स्पष्ट त्यांनी भूमिकाही मांडली.
देशात भाजपची अघोषित आणिबाणी आहे, ज्यांना भाजपने बोलावलले आणि जी लोक त्यांच्याकडे गेली नाही, त्यांच्यामागे अशी चौकशी लावत त्रास देण्याचा कार्यक्रम भाजपकडून सुरू असल्याचेही नाईकांनी म्हटले आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू असताना मला ही नोटीस बजावत निवडणूक आणि प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.