आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद:उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी, लवकरच केली जाणार अधिकृत घोषणा

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरून सुरू असलेला गोंधळ निवडणूक आयोगाने राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा करून संपुष्टात आणला. आता शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी नक्की केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. सेनेच्या कोट्यातील एका जागेवर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी असेल. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या निवृत्त झाल्या आहेत. परंतु त्या उपसभापती असल्याने त्यांना उमेदवारी देणे आवश्यक असल्याने शिवसेना दुसरी जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मागून घेणार आहे. 

रिपाइंला एक जागा देण्याची भाजपकडे मागणी 

भाजपला ४ जागा जिंकण्याची खात्री वाटत आहे. भाजपचे ३ आमदार निवृत्त झाले असून त्यांची आता ४ जागांवर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पैकी एक जागा आपल्याला मिळावी, असा प्रयत्न रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुरू केला आहे.