आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या स्मारकात स्थान नाही:उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, मे 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण होणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम मे 2023पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर काही काळातच ते जनतेला खुले होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

तसेच, या स्मारकात शिवसेनेचा पहिला नगरसेवक, पहिला आमदार, पहिला खासदार, पहिला मुख्यमंत्री यांची माहिती दिली जाईल. मात्र, शिवसेनेच्या नावावर झालेल्या तोतया मुख्यमंत्र्यांना यात स्थान नसेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईतील महापौर बंगल्यात सुरू असलेल्या बाळासाहब ठाकरे स्मारकाच्या कामाची माहिती आज आज उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, स्मारकात शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांची माहिती दिली जाईल. मात्र, केवळ शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांची माहिती दिली जाईल. शिवसेनेचे नाव मिळवून तोतयागिरी करत मुख्यमंत्र्यांना या स्मारकात स्थान नसेल.

बाळासाहेबांचा 10 वा स्मृतीदिन

उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या 17 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृती दिन आहे. म्हणता म्हणता बाळासाहेबांना आपल्यातून जाऊन 10 वर्षे झाली. तेव्हाच बाळासाहेबांच्या स्मारकाचीही घोषणा केली होती. याबद्दल अनेकांच्या मनात कुतुहल आहे की, स्मारक नेमके कसे असेल, कधी जनतेसाठी खुले होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे.

58 टक्के काम पूर्ण

उद्धव ठाकरे म्हणाले, स्मारकाचे जवळपास 58 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील मेपर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर काही काळ स्मारक पूर्ण करण्यात जाईल. या स्मारकात बाळासाहेबांशी संबंधित सर्व ऑडिओ, व्हिडिओ, फोटो, वृत्तपत्रातील बातम्यांचे कात्रण, त्यांची व्यंगचित्रे यांचा समावेश असेल. मात्र, या स्मारकात बाळासाहेबांचा पुतळा नसेल. कारण केवळ पुतळा म्हणजे स्मारक नाही. हे केवळ संग्रहालय असणार नाही. तर ते स्फुर्तीस्थान, प्रेरणास्थान असणार आहे.

प्रेरणास्थळ असेल

उद्धव ठाकरे म्हणाले, एखाद्याला जीवनात नैराश्य आले असेल आणि त्याने या प्रेरणास्थळाला भेट दिली तर तो पुन्हा उर्जेने भारून जावा, त्याच्या मनगटात लढण्याची हिंमत यावी, अशा पद्धतीने हे स्मारक उभारण्यात येत आहे. यावर पत्रकारांनी शिंदेच्या बंडानंतर तुम्ही स्मारकाला भेट दिली तेव्हा तुम्हाला लढण्याची उर्जा तेथूनच मिळाली का? असा खोचक सवाल केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे माझ्या मनात आहे. ते कायमच मला शक्ती, प्रेरणा देत असतात. बाहेरून उर्जा घेण्याची मला आवश्यकता नाही.

उद्धव ठाकरेंचे आवाहन

उद्धव ठाकरे म्हणाले, हे स्मारक परिणूर्ण असावे यासाठी राज्य तसेच देशभरातील नागरिकांकडे, पत्रकारांकडे, कार्यकर्त्यांकडे बाळासाहेबांसदर्भात जे काही फोटो, कात्रणे, व्हिडिओ असतील तर सर्व बाळासाहेब स्मारक समितीकडे द्यावेत. त्यामुळेच हे स्मारक परिपूर्ण होण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...