आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ठाकरे यांनी सोलेगाव येथे जाऊन तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांना बारसू सोलगाव येथे सभा घ्यायची होती. मात्र, प्रशासनाने या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधला. सरकारने स्थानिकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
LIVE
- उद्धव ठाकरे बारसूच्या दिशेने रवाना. काताळ शिल्पांची करणार पाहणी.
- रिफायनरीला बारसू सोलगावच्या लोकांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प आणू नका, उद्धव ठाकरे यांचे सरकारला आवाहन.
- हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
- उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे ग्रामस्थांथी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने गावकऱ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन केले.
- उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर राजापुर तालुक्यातील साखरकुंभे गावात दाखल झाले आहे.
- याठिकाणी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले आहे.
-लोकांचा रोष आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे याठिकाणी आल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
- वैभव नाईक म्हणाले, राणेंमध्ये हिंमत असेल तर विरोधकांची भेट घेऊन दाखवा.
-ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा कातळशिल्प परिसरात तैनात पोलिसांशी बंदोबस्तावरुन वाद झालेला आहे.
- भास्कर जाधव म्हणाले, याठिकाणी आणायचाच असेल तर वेदांता-फॉक्सकॉन, एअर बस प्रकल्प आणा. सरकार प्रामाणिक नाही.
-उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल झाले असून ते ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.
-सध्या उद्धव ठाकरे बारसूतील प्रसिद्ध कातळशिल्पाची पाहणी केली. त्यावेळी एक कातळशिल्प वाघाचे आणि दुसरे गेंड्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. ही जागा रिफायनरीच्या जागेत येत असल्याचे ठाकरे म्हणाले.
-नीतेश राणे या दौऱ्याबाबत बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे याठिकाणी हेलिकॉप्टरने आले ते कुठला व्यवसाय करतात? त्यांचे धंदे कोणते? याबाबत त्यांनी स्पष्ट करावे. वाचा सविस्तर
आंदोलकांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूचा दौऱ्यावर आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. प्रशासनाने रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र सभा घेता येणार नाही.
समर्थकही ठाकरेंची भेट घेणार
उद्धव ठाकरे आज बारसूत सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी परिसरातील विरोधकांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. या दौऱ्यात विरोधकांसोबतच रिफायनरीचे समर्थकही ठाकरेंची भेट घेणार आहेत. समर्थक संमतीपत्रे सादर करणार आहेत.
महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा
बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी तिथे 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी पत्र दिले होते. मात्र, तिथे लाठीमार करा असे पत्र दिले होते का? बारसूमध्ये अत्याचार करून प्रकल्प करा, असे पत्र दिले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची सांगितले जात आहे.
पवार-ठाकरेंच्या परस्परविरोधी भूमिका
रत्नागिरीतल्या बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्यात. त्यामुळे राजकीय गोटात महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी बारसू प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले. मात्र, ठाकरे गटाने या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.
बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही
मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारला बारसूवरुन इशारा दिला होता. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. तिथे मी 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी तेव्हा बारसूसाठी पत्र दिले होते. मात्र, असा अत्याचार करून प्रकल्प उभारा म्हणून पत्र दिले नव्हते, असा घणाघाती हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर केला होता. त्यामुळे आता त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.