आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''आजपासून ते आशिर्वाद यात्रा काढत आहेत, चोरांना तुम्ही आशिर्वाद देणार का? मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला पण चेहरा चोरासारखा झाला. तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा; पण मेरा खानदान पुरा चोर है. हा कपाळावर लागलेला चोरीचा शिक्का अजिबात या जन्मात पुसला जाणार नाही'' असा घणाघात उद्धव ठाकरेंनी आज केला. ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आयोजित सभेत आज बोलत होते.
आम्ही काय पाप केले?
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही काय असे पाप केले, कोविडमध्ये चांगले काम केले ते पाप, कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न केले ते पाप. कोकण शिवसेनेचे जीव की, प्राण आहे. शिवसेनेची सत्ता गेली पण कोकणात विजयी झालो. शिवसेनाप्रमुखांनी याच मैदानात माथा टेकवला.
ते - ते चोर आहेत
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याची काडीमात्र संबंध नाही ते गादीवर बसले म्हणून अशी देशाची परिस्थिती आहे. गोमूत्र शिंपडून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर शहीदांच्या रक्ताने स्वातंत्र्य मिळाले. गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल, प. बंगालमध्ये सुभाषबाबू आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंना चोरले. जे - जे धनुष्यबाण घेवून येत आहे ते चोर आहेत.
मर्दुमकी शिल्लक असेल तर..
ठाकरे म्हणाले, मर्दुमकी शिल्लक असेल तर धनुष्यबाण घेवून या मी मशाल घेवून येतो. महाराष्ट्र करेल तो फैसला मला मान्य आहे. मला घरी जा म्हटले मी तेव्हा वर्षा सोडले तसा घरी जाईल पण निवडणूक आयुक्त म्हणाले घरी जा तर मी त्यांना घरी पाठवेल. मी हवा की नको हे तुम्ही ठरवा.
पाशवी वृत्ती गाडा
ठाकरे म्हणाले, ही लढाई बाकीच्या सगळ्यांना कळले की, आज आणि आत्ताच किंवा 2024 तर तेव्हाही स्वातंत्र्यलढ्याशी सुताराम संबंध नसलेली पाशवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करीत असेल तर त्या वृत्तीला येथेच गाडावे लागेल. शपथ येथे हीच घ्या की, मी माझ्या भारतमातेला यांच्या गुलामगिरीत अडकू देणार नाही. तसे जर केले तर देशाची 2024 ची शेवटची लढाई ठरेल. त्यानंतर मतदानाचा अधिकार राहणार नाही. हुकुमशाही सुरू होईल. माझ्या सभेनंतर काही बोंबलणार आहेत, काहींचा जन्म शिमग्यात झाला. धुळवड होऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारताता भगवा फडकू द्या.
शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का?
उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का? तुम्ही सांगा मी हवा की नको तुम्ही सांगा. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. मी सहन करून घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवानगी घेवून शिवसेनेची स्थापना झाली नाही. न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. तुमच्या सारखे आले आणि गेले जातीलही पण शिवसेना कायम राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.