आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले, तेव्हा हे शेपूट घालून बसले:मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्नाटकची हिंमत झाली नाही - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

रत्नागिरी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा हिंमत झाली नाही. तेव्हा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा झाला नव्हता. तो आता झाला, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले तेव्हा हे शेपूट घालून बसले.'' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी आज खेड (जि. रत्नागिरी) येथे केला. ते आयोजित सभेत बोलत होते.

ते दिल्लीसमोर शेपट्या घालून बसले

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीसमोर ते शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते.आपल्या मुख्यमत्र्यांचा अर्धा वेळ दिल्लीतच जात आहे. जागतिक पातळीवर कोरोना काळात मविआच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचेच नाही तर सर्व लोकांचे कौतूक झाले. त्याही परिस्थितीत आपल्याकडे उद्योगधंदे येत होते. सर्व उद्योग गुजरातेत गेले. आयफोनचा कारखाना कर्नाटकात जातो महाराष्ट्राच्या हाती काय आहे.

ते महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार?

ठाकरे म्हणाले, एसटी महामंडळाच्या बसवर आमची जाहीरात होती की, माझा महाराष्ट्र माझे कुटुंब होय महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. पण जो कुटुंब बदलतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले; पण आपले शेपूट घालून बसले. आमचे मविआ सरकार चांगले चालत होते पण माशी कुठे शिंकली. नितीन देशमूखांनी भर सभेत सांगितले की, कसे झोपेचे इंजेक्शन दिले. कसा छळ झाला. त्यांनी छळून लोकांना गटात ओढले. राजन साळवींच्या घरी छापा घातला.

जीभ छाटू

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही देशद्रोही नाही तुम्ही कसे म्हणता तुम्ही बोलू शकत नाही. आ्म्ही जीभ छाटू. मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटतात. केजरीवाल माझ्याकडे आले व म्हणाले की, आपल्याला एकत्र लढायला हवे. आम्ही पंतप्रधानांना पत्राद्वारे प्रश्न विचारला. ज्यांच्या - ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावरील कारवाईबाबत विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...