आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू:मंत्री बच्चू कडू यांचा ठाकरे सरकारला इशारा; धान खरेदीवरून आक्रमक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानादिवशी शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

शिवसेनेकडून जुळवाजुळव सुरू

राज्यसभेसाठी सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना सध्या मतांची जुळवाजुळव करत आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी संजय पवार यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, या निवडणुकीत सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या कडू यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानावरून कोंडीत पडले आहे.

भाजपला मतदान नाही, पण...

बच्चू कडू म्हणाले की, आमचे मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे आणि धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत आहे. केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला हजार रुपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

अपक्षांची भूमिका महत्त्वाची

राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला सहा जागांसाठी मतदान होणार असून, यापैकी पाच जागांवर संबंधित पक्षाचे उमेदवार सहजपणे निवडून राज्यसभेवर जाणार आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांनी उमेदवारी दिली असून, भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे. तसेच आघाडी सरकारमधील मित्रपक्षांची मते फुटणार नाही. यासाठी देखील ठाकरे सरकार काळजी घेत आहे. त्यात आता ऐनवेळी बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

जयस्वालांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री अपक्ष आमदारांना निधी देताना टक्केवारी मागतात. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता नसली तरी भविष्यात राज्य सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे आशिष जयस्वाल यांनी म्हटले. त्यानंतर आता बच्चू कडूंनी देखील सरकारला इशारा दिला आहे.

शिवेसेनेपेक्षा जास्त मते

शिवसेनेपेक्षा जास्त मते भाजपकडे असल्याचा दावा भाजपने केला आहे. राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनी कुमार वैष्णव यांच्यासह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीष महाजन, पंकजा मुंडे, पीयूष गोयल, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...