आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''अदानीबाबत चौकशी करावी की, नाही. तुमचे काय मत आहे? माझे मत वेगळे आहे. अदानींची चौकशी करूच नका. कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढलीय की, एक माणूस एवढी मेहनत करुन एवढ्या वरती जात असेल तर त्यांचे संपूर्ण आत्मचरीत्र शालेय अभ्यासक्रमात लावा की, श्रीमंत कसे व्हायचेय असा जोरदार टोला लगावत ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या कामगिरीचे वाभाडे काढले.
उद्धव ठाकरे आज मविआच्या वज्रमूठ सभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात केला.
चौकशी हवी की, चरीत्र हवे
उद्धव ठाकरे म्हणाले, अदानींची चौकशी हवी की, चरीत्र हवे. मी कुठे म्हणतो की, ते गुन्हेगार आहेत. चौकशी करा म्हणत नाही. पण निदान त्यांनी काय काय केले की, माझा कष्टकरी घाम गाळत कष्ट करुनही त्यांना रोजची संध्याकाळची चूल कशी पेटेल याची त्यांना चिंता असते. हे अशांसाठी अदानींच्या आत्मचरीत्रामुळे मार्गदर्शक होईल. आम्ही अडाणी आहोत आम्हाला अदानी व्हायचेय.
नाकर्ते राज्यकर्ते इतिहास बदलत आहेत
उद्धव ठाकरे म्हणाले, सत्य मलिकांनी जो गोप्यस्फोट केला. त्यात चाळीस जवान मारले गेले. त्यात महाराष्ट्राचेही जवान होते. चीन आपल्या देशाचा भुगोल बदलतोय आणि आपले नाकर्ते राज्यकर्ते आपला इतिहास बदलत आहे. जो इतिहास लिहिलेला, घडलेला आहे तो बदलत आहे. बदलू नका तो घडवा हे मी त्यांना सांगतो. चीन देश कुरतोय त्यांच्यामागे इडी, सीबीआय लावा. झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिका्ंच्या घरी तपासयंत्रणा पाठवत आहेत.
अच्छे दिन येईल आले का?
उद्धव ठाकरे म्हणाले, असे समजा उद्या निवडणुका आल्या आणि मी सांगतो सर्व महाराष्ट्राला वीज, शिक्षण, रेशन फुकट देतो. टाळ्या वाजवू नका. येथेच चुकत आहात. हे शक्य नाही. अजित पवार म्हणतील वाट लागून जाईल. प्रत्येक घरावर सोन्याचे कौल चढवणे शक्य आहे का? सर्व नाहीच म्हणणार पण मी म्हणतो होईल मग मी असे आश्वासन दिले की, तुम्ही मत देता. सांगा..२०१४ ला काय सांगितलं? अच्छे दिन येईल आले का?
देशाची बरबादी होतेय
उद्धव ठाकरे म्हणाले, हजारो लोकांना नोकऱ्या तर दिल्या नाही. पण जातीय दंगली, जातीय तणाव निर्माण करायचा. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा. मग तुम्ही त्यात ऐवढे व्यग्र होता की, जाऊद्या नोकरी बेकरी सोडा, सोन्याचे कौल सोडा. आपण मेला तर घर काय करायचे. लढ..लढायचे, रक्त सांडायचे. त्यावर राजकारण करायचे. नंतर निवडून यायचे. पुन्हा निवडणुका आल्या की, अशीच थाप मारायची आणि जिंकायचे. यात देशाची बरबादी होत आहे.
शिवसेनाप्रमुखांचे महत्व कमी करायचे प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले, बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा कशी पळापळ झाली मी सांगण्याची गरज नाही. यांची विकृती एवढी आहे की, स्वतःला हिंदु हृदयसम्राट बनता येत नाही म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्वही कमी करायचा त्यांचे प्रयत्न आहे. मी म्हणतो की, तेव्हा रस्त्यावर कुणीच नव्हते. कुत्री भुंकत होती तेव्हा भाजपवाले कुठे होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.