आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रवृत्ती'विरोध:मोदींच्या जय बजरंगबलीवर ठाकरेंचे शरसंधान; धार्मिक प्रचारासाठी निवडणूक कायद्यात बदल झाल्याचा टोला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये मतदान करताना जय बजरंगबली म्हणा, असे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिले. आता धार्मिक प्रचारासाठी निवडणूक कायद्यात बदल झाला असेल, असा टोला हाणला. शिवाय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतल्याची आठवणही सांगितली.

उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्प, शरद पवारांचा राजीनामा ते कर्नाटक निवडणुका अशा नाना मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली.

नेमके प्रकरण काय?

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकातल्या अंकोला येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी मतदानयंत्रावर बटण दाबताना जय बजरंगबली असा उच्चार करा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बजरंगबली की जय, असे बोलून मतदान करा, असे सांगतात. मला वाटते आता धार्मिक प्रचाराबाबत निवडूक कायद्यात बदल झाला असेल. त्यामुळे आता मी कर्नाटकातल्या मराठी भाषकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा जय शिवराय म्हणून मराठी अस्मिता जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातवर कृपादृष्टी का?

उद्धव ठाकरे म्हणाले की, बारसूत मी भाजप, शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही. नाणार प्रकल्प रद्द केला. तेव्हा ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो होता. त्यावेळी दिल्लीतून हा चांगला प्रकल्प आहे, जाऊ देऊ नका, असे सांगितले. मात्र, आता महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. केवळ माझे पत्र घेऊन नाचू नका. माझ्या काळात येणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी का? त्यासाठी डोक्यावर बंदूक टेकून परवानग्या घेता आणि प्रकल्प चांगले सांगता. याला काही अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित वृत्तः

मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंचे शरद पवारांना उत्तर

मुंबई केंद्रशासित करण्याचा मुद्दा, उद्धव ठाकरे-शरद पवारांची परस्परविरोधी भूमिका; विषयाला पूर्णविराम देण्याचा पवारांचा सल्ला

संजय राऊत काँग्रेसचे दलाल, भाजपविरोधात बेळगावात प्रचार केला; देवेंद्र फडणवीसांकडून खरपूस समाचार