आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामनातून ठाकरेंचा हल्लाबोल:लोकशाही मोदी-शहांची हुकूमशाही नव्हे, सर्वोच्च न्यायालयाच्या मंदिरात 40 चप्पलचोरांना थारा नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही म्हणजे मोदी-शहांची हुकूमशाही नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मंदिरात 40 चप्पलचोरांना थारा मिळणार नाही, अशाप्रकारची टीका ठाकरेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. रस्त्यांवरील ‘कुंड्या’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली, असेही सामनात म्हटले आहे.

सामनात म्हटले आहे, भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली, पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे. असूच शकत नाही. खरी शिवसेना विधिमंडळ, संसदेच्या बाहेर आहे.

न्याय मेला नाही

सामनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, ‘‘आम्ही म्हणजेच शिवसेना!’’ या ‘आम्ही’वर न्या. चंद्रचूड यांनी घेतलेला आक्षेप महत्त्वाचा आहे. ‘‘विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही.’’ न्या. चंद्रचूड यांनी नेमके विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल.

चोरबाजार होऊ शकतो

सामनात म्हटले आहे, चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल? चोरांना रस्त्यावर अडवून जनता जागोजागी जाब विचारीत आहे. मिंधे गटाच्या भजनी लागलेले आमदार बच्चू कडू हे धाराशीव जिल्हय़ात एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील लोकांनी, आबालवृद्धांनी त्यांना घेरावच घातला. ‘‘चोर-डाकूंसोबत तुम्ही गेलात कसे? लाजलज्जा गुंडाळून ठेवलीत काय?’’ असा जाब विचारून लोक त्यांची गाडी अडवू लागले तेव्हा बच्चूभाईंचा आंबट चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

निवडणूक आयोगाची मनमानी

सर्वच चाळीस आमदारांवर जागोजागी हीच वेळ आली. कारण शिवसेना जनतेत आहे. फक्त चार भिंतींतील घुमटाखालच्या विधिमंडळात नाही. न्या. चंद्रचूड यांनी नेमके तेच आणि तेच स्पष्ट केले आहे. लोकशाही म्हणजे मोदी-शहांची हुकूमशाही नाही व निवडणूक आयोगाची मनमानी म्हणजे अंतिम निकाल नाही. बऱ्याच गोष्टी अजून ठरायच्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चोर मंडळाने विधिमंडळ व संसदेतील शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेतली. का? तर म्हणे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नेतृत्व भाजपचे ‘मिंधे’ असलेल्यांच्या हातात दिले.

बातम्या आणखी आहेत...