आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''महाराष्ट्रापासून जो कुणी मुंबई तोडेल त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पण मुंबई तोडता येत नाही, म्हणून मुंबईची हत्या करण्याचा मनसुबा आहे. तिथले उद्योग राज्याबाहेर न्यायचे. मुंबईत सर्वात जास्त महसूल येतो. तेथील धागेदोरे कापायचे हा डाव असून मुंबईच्या ठेवींवरही यांचा डोळा आहे असा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.
उद्धव ठाकरे आज मविआच्या वज्रमूठ सभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात केला.
अन्...हे आपले मिंध्ये!
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईची लूट भांडवलदारी वृत्तीचे सरकार करतेय. आपले मिंधे बाळासाहेबाचा विचार त्यांच्या धमण्यात असता तर त्यांनी गद्दारी केलीच नसती. मराठी भाषा आम्ही राज्यात सक्तीची केली. आपले सरकार पडल्यानंतर तीच मराठी भाषा मिंध्यांनी ऐच्छिक केली. हीच जर तुमची वृत्ती असेल तर काय बाळासाहेबांचे विचार तुम्ही अंगिकारता. तुम्हीच मराठी भाषेचे धिंडवडे काढत असाल तर अभिजात करणार कोण?
मला मिंध्यांना सांगायचेय
उद्धव ठाकरे म्हणाले, आंदण नाही तर मुंबई लढवून मिळवली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे महिलांनी गोळ्या घाला असे संयुक्त महाराष्ट्रासाठी म्हटले होते. मला मिंध्यांना सांगायचे की, मिंधे होवून राज्यकारभार करू नका.
भाजपच्या तीनपाट्यांची छिद्र बुजवा
उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकाची निवडणूक रंगात आली आणि पंतप्रधानांनी शिव्या मोजणारी ही सभ्य माणसे आहे. शिव्या देता येतात पण मी समर्थन करीत नाही. तुमची भोकं पडलेली तीनपाटं मला, आदित्य आणि शिवसेनेला रोज बोलत आहेत त्यावर काय बोलले नाही. तीनपाट्यांची छिद्र बजुवा. तुमची लोक शांत राहीली तरच आमची लोक शांत राहील. वज्रमूठीचा हिसका गेल्या काही दिवसांत आपण पाहीला. जिथे जिथे निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकात आपण त्यांनी चारीमुंड्या चीत केले.
बारसूत जाण्यापासून कोण रोखतेय बघू
उद्धव ठाकरे म्हणाले, बारसूमध्ये येत्या सहा तारखेला जाणार आहे. तिथल्या लोकांना भेटून मी बोलणार नाही. बारसूत काय आहे. तिथे जाण्यापासून कोण रोखतं बघतो. बारसूत माझ्या नावाने पत्र दाखवत आहे. पण त्या पत्रात लाठ्या चालवा, गोळ्या चालवा पण रिफायनरी करा असे कुठे म्हटले गेले. मी पवारांच्या अमलाखाली गेलो, राष्ट्रवादी दादागिरी करतेय असे आरोप केला जात आहे. आज उदय सामंत भेटून आले तेव्हा काय. शेफारलेली लोक मला बाळासाहेब शिकवले जाते तुम्ही तर कधी त्यांना भेटलेही नाहीत. बारसूचे पत्र मी दिले होते तर पालघरमध्ये आदिवासींच्या घरात पोलिस घुसवले.
सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनच्या घशात
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील बीकेसीची जागा सोन्यासारखी जमीन बुलेटट्रेनच्या घशात घातली. तिथे आपण कोरोना सेंटर उभारले होते. कुणासाठी बुलेट ट्रेन करताय. आरे कारशेडला मी स्थगिती दिली होती. कांजूरला परवानगी दिली होती. पण केंद्र सरकार कोर्टात गेले. केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी बांधिल असतात पण ते कोर्टात गेले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.