आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशक्ती - भीमशक्ती युतीचे संकेत:ठाकरे म्हणाले - प्रकाशजी सामान्यांसाठी आपल्याला एकत्र यावेच लागेल, यावर कुणाचा आक्षेप नसावा

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकशाही तुडवून सत्ता हवी असेल तर ती माणसं सत्तेसाठी लायक नाहीत त्यांना खाली खेचा - ठाकरे

''सत्ता सर्वांनाच हवी, पण त्यासाठी वाट्टेल ते करायचे. लोकशाही तुडवून सत्ता हवी असेल, घटनेची कलमं पायदळी तुडवून सत्ता हवी असेल तर अशी माणसे सत्तेसाठी लायक नाहीत. यांना पहिल्यांदा खाली खेचायला हवे. सर्वच गोष्टी त्यांना त्यांच्या बुडाखाली हव्या आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजपवर केला.

युतीचे संकेत

ठाकरे म्हणाले, सामान्यांसाठी प्रकाशजी आपल्याला एकत्र यावेच लागेल. आपण जर पुढे काही करणार नसतील आणि लोकांना जागे करून पुढे काहीच करणार नसू तर आपण ते काम न केलेले बरे आणि आपण ते काम करणार नसू तर आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनीही निवडणुका लागल्या तर आम्ही एकत्र लढू असे स्पष्ट केले.

प्रबोधनकार डाॅट काॅम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. प्रबोधनकारांवर व त्यांच्या विचारांवर पी.एचडी. करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला.

वाट दाखवणारे आदर्श हवे की, वाट लावणारे? सवाल करताना उद्धव ठाकरे
वाट दाखवणारे आदर्श हवे की, वाट लावणारे? सवाल करताना उद्धव ठाकरे

त्यांचे नातू काय करतील?

ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि मी व्यासपीठावर एकत्र आलो हे पहिल्यांदा झाले, पण आमचा वैचारिक वारसा एकच आहे. आपला देश कसा विचित्र चालला आहे. प्रबोधनकार आणि डाॅ. आंबेडकर यांनी समाजाला आदर्श दिला. मी आणि प्रकाश आंबेडकर आम्ही त्यांचे नातू आहोत. ते आज एकत्र आले पण तिकडे आजोबा बोलत आहेत. त्यांचे नातू काय करतील मला माहीत नाही.

सीएम शिंदेंवर नाव न घेता टीका

ठाकरे म्हणाले, वाट दाखवणारे आदर्श मानायचे की, वाट लावणारे आदर्श मानायचे हाच मोठा प्रश्न आहे. स्वःतचा चेहरा दाखवला तर लोक जवळ येणार नाही म्हणून काही लोक दुसऱ्यांचा मुखवटा घालीत आहे. तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजाची निती वापरली जात आहे.

तसे आमचे हिंदुत्व नाही

ठाकरे म्हणाले, हल्ली जे चालले ते योग्य नाही. गोमांस खाणाऱ्याला मारले जात आहे पण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी उमेदवारी दिली जात आहे. हे आमचे हिंदुत्व नाही. आपण आदर्श कुणाला मानायचे. पुस्तक वाचून तुम्ही काय करता? आयुष्यात त्या दिशेने काय केले हे महत्वाचे आहे.

पूर्ण स्वातंत्र्य धोक्यात

ठाकरे म्हणाले, आज पूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत. राज्य ही केंद्राची गुलाम नाहीत. राज्याला केंद्राऐवढेच समान अधिकार आहेत.

आधी खाली खेचा

ठाकरे म्हणाले, सत्ता सर्वांनाच हवी, पण त्यासाठी वाट्टेल ते करायचे. लोकशाही तुडवून सत्ता हवी असेल, घटनेची कलमं पायदळी तुडवून सत्ता हवी असेल तर अशी माणसे सत्तेसाठी लायक नाहीत. यांना पहिल्यांदा खाली खेचायला हवे. सर्वच गोष्टी त्यांना त्यांच्या बुडाखाली हव्या आहेत.

एकत्रच यावे लागेल

ठाकरे म्हणाले, लोकशाहीचे स्तंभ गुलाम म्हणून वापरले जात असतील तर त्या स्तंभाची गरज काय? न्याय यंत्रणा बुडाखाली हवी असेल आणि सर्वांना गुलाम बनवले जात असेल तर लोकशाही टिकेल का? सर्व सामान्य माणसांची सर्व दारी बंद झाली असून न्यायासाठी केवळ न्यायालयच फक्त उरले आहेत. प्रकाशजी आपल्याला एकत्र यावेच लागेल. आपण जर पुढे काही करणार नसतील आणि लोकांना जागे करून पुढे काहीच करणार नसू तर आपण ते काम न केलेले बरे आणि आपण ते काम करणार नसू तर आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.

आपल्याला काय हवे? - प्रकाश आंबेडकर

लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असे भांडण आहे. जनतेला ठरवावे लागेल की, आपल्याला हुकुमशाही हवी की लोकशाही असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

देशाला गुलामीचा इतिहास

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुस्मृती असे विष आहे की, ते प्यायल्यानंतर बळी माणसांचा तर जातो पण देशाचाही जातो. यातून आपण जेवढे बाहेर पडू त्यातून लवकर आपण बाहेर पडू. देशाला गुलामीचा इतिहास आहे. गुलामीचा एकाच वर्गाची आहे. उरलेले त्यात भरडले आहे.

नव्याने काही उभारायचे का?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजेशाही ही संकल्पना क्षत्रियांची होती. त्यांची लढण्याची संकल्पना होती. एकदा क्षत्रिय हरला की, उरलेले सर्व हरले. उरलेल्यांना शस्त्र घेण्याचा अधिकार नव्हता. याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता. तो अपवाद बघत- बघत मी असे म्हणेल की, आम्ही मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की, नव्याने काही उभे करणार आहोत.

कोणती विचारसरणी हवीय?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, हिंदु हा शब्द आपण मानत आलो. यात दोन विचारसरणी आहेत असे मी मानतो. एक वैदिक परंपरा तर दुसरी संतांची परंपरा. त्यांचे वर्णन करताना विधेवेचे एकीकडे मुंडण तर दुसरीकडे पुर्नविवाह आहे. आपल्याला नेमकी कोणती पाहीजे. प्रबोधनकारांनी वैदीक परंपरेवर आसूड ओढले आहेत. भवितव्याचा विचार करायचा असेल तर हा धर्म सार्वजनिक कसा होईल याची त्यांनी मांडणी केली.

त्यांनी धर्म नाकारला नाही

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी कधीही धर्म नाकारलेला नाही. धर्म हा आवश्यक आहे हे त्यांनी मानले परंतु, धर्माच्या अधिन राहुन काही करता येणार का तर नाही. या तिघांचे धर्माशी भांडण नव्हते तर सामाजिक व्यवस्थेच्या भांडणाचे होते. सामाजिक व्यवस्थेत सुधारणा काय हव्या हे त्यांनी मांडले. सणांना त्यांनी सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला.

दडपशाही वाढली

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण त्यांच्यामागे उभे का राहीलो नाही? कारण आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला. एका बाजूला दडपशाहीचे वातावरण देशात वाढले आहे. वैदीक धर्मातही हुकुमशाही आहे. देशात हुकुमशाही, हिटलरशाही वाढतेय हे आपण बोलतो. त्या - त्या व्यवस्थेतील राज्यकर्त्यांच्या पक्षात ही गोष्ट इनबिल्ट आहे. जो वारीला जातो त्यात मात्र अशी दडपशाही नाही.

आज चाॅईसची संधी

प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन समांतर व्यवस्था आपण आज एकाचवेळी घेऊन चालू शकत नाही. भांडण कुठले तर संतांनी, धर्मांनी आणि वैदीक धर्मांनी सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेत आहे. फ्रिजलाॅजीचा हा विषय आहे. कोणता सा्माजिक विचार घ्यायचा हे ठरवावे लागेल हाच खरा लढा आहे. संविधानात सेक्युलर हा शब्द वापरला गेला पण तो शब्द घटनेत कुठेही डिफाईन केला नाही. हा शब्द एकाच ठिकाणी बंदिस्त करू शकत नाही, कारण पिढी जशी बदलते तसे विचार बदलतात. पीढी बदलते तसे शब्दाचे अर्थ बदलतात.

देशात अराजकता - सुभाष देसाई

लोकार्पण सोहळ्यात संबोधित करताना सुभाष देसाई.
लोकार्पण सोहळ्यात संबोधित करताना सुभाष देसाई.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई म्हणाले, आज देशातील अराजकता दुर करण्यासाठी देशातील सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रबोधनकारांचे साहित्य महत्वाचे आहे. सध्या डेटींग अ‌ॅपही सुरू केली जात असतानाच अशी वैचारिक वेबसाईट चालवण्याचे काम करणे हे कौतुकास्पद आहे. प्रबोधनकार यांचे कार्य धक्क्यामागून धक्के देणारे आहे. ते थोर समाजसुधारक होते.

बातम्या आणखी आहेत...