आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशक्ती- भिमशक्ती पुन्हा एकत्र येणार?:उद्धव ठाकरे काहीही करू शकतात, ते आणि प्रकाश आंबेडकर एकत्र बसल्यास नवल नाही- बावनकुळे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकमेकांसोबत फोनवरून संभाषण झाले असून सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यात संभाव्य राजकीय युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात शिवशक्ती- भिमशक्ती होणार का याची चर्चा आता सुरू आहे. तर शिंदे गट आणि भाजपकडून यावर आतापासूनच टीकास्त्र सोडले जात आहे.

चर्चा पुढे सरकणार?

20 नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील एका कार्यक्रम मुंबईत आहे. यासाठी उद्धव ठाकरे तेथे येणार असून प्रकाश आंबेडकरही उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा पुढे किती पुढे जाते हे येत्या काळातच स्पष्ट होईल. बोलणी निश्चित झाल्यास ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र भेट घेऊन चर्चा करू शकतात.

वंचितची आधीच युतीची भूमिका

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत आधीच एकदा भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादी अथवा शिवसेना यापैकी जो पहिला येईल आणि आम्हाला जे सोईस्कर वाटेल त्यांच्यासोबत आम्ही समझोता करू असे स्पष्ट केले होते तसे बोलून त्यांनी युतीचा प्रस्तावच दिला होता. तर यो गोष्टीत फार वावगे आहे असे दिसत नाही, असे विधान परिषदेचे विरोधी ​​​​​​पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

ते काहीही करू शकतात- बावनकुळे

उद्धव ठाकरेंसह त्यांच्या गटाची सद्यस्थिती पाहता ते काहीही करू शकतात. ते आणि प्रकाश आंबेडकर एकत्र बसले तरी नवल नाही. त्यांना आता महाविकास आघाडी तयार करायची आहे. ती केलीच आहे, पण त्यांनी आता ताकद वाढवण्याचे कितीही प्रयत्न करीत असले तरी आमच्याकडे देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदेंसारखे धुरंधर आहेत. तर हिंदुत्त्वाची भूमिका विसरली जात असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

शिवशक्ती - भिमशक्तीचा प्रयोग

1995 साली राज्यात यूती सरकार आले. तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वातच शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्या होत्या. शिवसेना, भाजप आणि रिपाईंची यूती झाली होती. पुढे 25 वर्षे ही यूती होती. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा आली. आणि 2017 साली पहिल्यांदा महायूती तुटली. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला. त्यावेळी मात्र, रामदास आठवलेंनी शिवसेनेऐवजी भाजपसोबत गेले.

बातम्या आणखी आहेत...