आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे दौरा:मुख्यमंत्र्यांचे आज ‘मातोश्री’बाहेर पाऊल; कोरोना आढाव्यासाठी पुणे दौरा, स्वतः गाडी चालवत पुण्याकडे झाले रवाना

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी आता “मातोश्री’बाहेर पडायला हवे, हा शरद पवार यांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतला

मुख्यमंत्र्यांनी आता “मातोश्री’बाहेर पडायला हवे, हा शरद पवार यांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी फारच मनावर घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री उद्या गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. सकाळी ९ वाजता मुंबईतून ते निघाले. विशेष म्हणजे स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री हे पुण्याला रवाना झाले आहेत. ११.३० वाजता पुण्याच्या कौन्सिल हाॅल येथे बैठक आहे. ५ वाजता मुंबईत परततील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यासमवेत असणार आहेत.

वांद्रे येथील ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानातून मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, अशी सर्वत्र ओरड होती. मंत्रिमंडळ बैठकांतसुद्धा ते ‘मातोश्री’ येथूनच व्हीसीद्वारे सहभागी होतात. याचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात शैथिल्य आले होते. तसेच मंत्रालय ओस पडले होते. राज्यात २४ मार्चपासून लाॅकडाऊन आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री केवळ दोन वेळा मुंबईबाहेर पडले आहेत. ५ जून रोजी कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यासाठी मांडवा (अलिबाग) येथे गेले. त्यानंतर १ जुलै रोजी पंढरपूरला आषाढी वारीच्या पूजेसाठी गेले हाेते.

मंत्रिमंडळाच्या १९ ऐवजी केवळ १० बैठका

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठका दर बुधवारी होतात. मात्र, लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक घेणे मागे पडले. २४ जुलैनंतर १९ मंत्रिमंडळ बैठका होणे अपेक्षित होते, मात्र झाल्या अवघ्या १०.