आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप पक्ष आहे की चोरबाजार?:उद्धव ठाकरेंची टीका; दरेकरांचा पलटवार - आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारट, अशी त्यांची वृत्ती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठीच भाजप दुसऱ्या पक्षातून आमदार, खासदार एवढेच काय तर स्वप्नही चोरत आहे. त्यामुळे हा पक्ष आहे की चोरबाजार?, अशी खरमरीत टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप आ. प्रवीण दरेकर यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्वभावच आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, अशी त्यांची वृत्ती असल्याची टीका दरेकरांनी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे म्हणाले, आचार विचार काहीही नसलेल्या भाजपला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मोदींचे नाही तर बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय कुणीही मतं देणार नाही. यासाठी भाजप शिवसेनेची, बाळासाहेबांची स्वप्न चोरत आहेत. हा पक्ष आहे की चोरबाजार?

मुख्यमंत्रीही कंत्राटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील कंत्राटी आहेत. त्या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही.

नैराश्यातून वक्तव्य - दरेकर

उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रविण दरेकर यांनीही टीका केली आहे. दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून आले आहे. शिवसेनेत अभूतपूर्व फुट पडल्यामुळे त्यांना निराशा आली आहे. त्यातच टोमणे मारणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे अशी त्यांची वृत्ती आहे

'मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन'चा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केलेल्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...