आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्षावर सुप्रीम काेर्टात हाेणारी सुनावणी लांबणीवर:उद्धव ठाकरे म्‍हणाले की, जे काय व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी जे काय व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी म्हणाले.

दरम्यान, साेमवारी नियाेजित ही सुनावणी त्रिसदस्यीय खंडपीठातील १ न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. मंगळवारी सुुनावणी हाेण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी हा विश्वास व्यक्त केला. मिरज-सांगलीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी जनता गद्दारांना धडा शिकवेल, असा विश्वास व्यक्त केला.लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणुका कधी येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो, ही लोकांची भावना आहे. पण निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे, असे मला वाटत नाही, असा दावा उद्धव यांनी केला.

प्रकरण घटनापीठाकडे जाणार?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणे, खरी शिवसेना कोणाची, तसेच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्यांवर सुनावणी होईल. सर न्यायाधीश एस. व्ही. रमणा या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

गुलाबरावांना सभागृहात झापल्याची शाबासकी
“मंत्री असो वा मुख्यमंत्री, सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे.सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे कौतुक केले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झापले होते. नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचे प्रकाशन ठाकरेंच्या हस्ते रविवारी झाले.

बातम्या आणखी आहेत...