आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:भेटायला बोलावताना व्यक्तीचे ज्येष्ठत्व, सामाजिक स्थान, प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावे, पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती

सध्या देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. राज्यातही रुग्ण सातत्याने वाढत आहे. मात्र हे सुरू असतानाच राजकीय वातावरणंही तापलेलं दिसतंय. नेत्यांचे एकमेकांवरील टीकास्त्र हे सुरूच आहे. दरम्यान महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याच्या चर्चाही सुरू आहेत. या काळात शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. सध्या या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता या भेटीवरुन भाजपचे नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

आशिष शेलार यांनी बुधवारी याविषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, कुणाला किती वेळा, कुठे भेटावे?हा विषय त्यांचा असला तरी...आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो...त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत "आनंदीआनंदच" आहे! असा टोला शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, असा आरोपही विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनीही नुकताच असा आरोप केला होता. महाराष्ट्र संकटात असताना मुख्यमंत्री हे मंत्रालयात आलेले नाहीत. ते केवळ मातोश्रीच्या बिळात बसलेले आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसेल तर मुख्यमंत्री हवाच कशाला असेही नारायण राणे म्हणाले होते. 

0