आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंनी माफी मागावी:याकूब मेमन कबर सुशोभीकरणास बावनकुळेंनी 'मविआ'ला धरले जबाबदार; काँग्रेस म्हणते भाजपच कारणीभूत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिखित संमती दिली. त्यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मात्र, याकूब मेमनच्या कबरीच्या गौरवाला भाजप थेट जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगताना दिसतोय.

मुंबई स्फोटांतला दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून नवा वाद उफाळून आला आहे. यावर भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

खुर्ची टिकवण्यासाठी...

बावनकुळे म्हणाले की, 'मविआ' सरकार चालवण्यासाठी, मुख्यमंत्रिपद टिकवण्याकरिता ​​​​​​बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करत मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणास उद्धव ठाकरेंनी अलिखित संमती दिली. कबरीच्या सुशोभीकरणासाठी 'मविआ' सरकारने मदत केली. यासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी.

'मविआ'च्या काळातील पाप

बावनकुळे म्हणाले की, हे 'मविआ' सरकारच्या काळातील पाप आहे. त्याला आताचे सरकार जबाबदार नाही. या घटनेने महाराष्ट्र कलंकित झाला आहे. महाराष्ट्राची प्रतिमा देशभरात खाली गेली. त्यामुळे कबरीच्या सुशोभीकरणासाठी मदत करणाऱ्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत आणि आरोपींना अटक करत शिक्षा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तसेच यानंतर अशी कृती महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही, ही काळजी सरकारने घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यावर म्हणाले की, सर्वात मोठी चूक भाजपची आहे. यूपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली. एक अफजल गुरू आणि दुसरा कसाब. मात्र, सरकारने दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले नाहीत. याचे कारण म्हणजे या लोकांच्या कबरी, ज्या ठिकाणी हे लोक दफन केले जातात, ती जागा कोणाला तरी रेलिंग पॉइंट बांधण्याची संधी देते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार झाले. इतके लोक का सामील झाले? भाजपने राजकीय फायद्यासाठी हे केले. याकूब मेमनच्या कबरीचा गौरव आज होत आहे. याला भाजप थेट जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.

काय प्रकरण?

मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकूब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे समोर आले. यावरून भाजपा आक्रमक झाली असून, भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...