आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:सोनियांच्या व्हीसी बैठकीला उद्धव आज लावणार हजेरी, भाजपविरोधी गटाच्या बैठकीला प्रथमच उपस्थिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी राजभवन येथे बोलावलेल्या बैठकीकडे उद्धव यांनी पाठ फिरवली होती

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव, मजुरांचे स्थलांतर आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित असणार आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी राजभवन येथे बोलावलेल्या बैठकीकडे उद्धव यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीत भाजपविरोधी गटातील १८ राजकीय पक्षांचे नेते हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी असतील.

बातम्या आणखी आहेत...