आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे. भाजपला मिळालेले 4 राज्यातील यश लक्षात घेत, शिवसेना देखील कामाला लागली आहे. आज शिवसेनेच्या खासदारांसह जिल्हाप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरूवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने शिव संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुख पक्ष बांधणी करणार आहेत.
या अभियानामार्फत शिवसेना करत असलेले कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणार आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, विनायक राऊत तसेच मुंबईतील इतर खासदार शिवसेना भवनात उपस्थित रहाणार आहेत. यासोबतच आगामी राज्यसभेच्या 6 जागांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य येणार ?
आगामी काळात राज्यात मनपासह जिल्हा परिषदेच्या निवडणूका आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने हे अभियान सुरू केले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य यावे म्हणून हे अभियान राबविण्यात येत आहे की काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
या अभियानाअंतर्गत शिवसेनेने अडीच वर्षांत केलेली विकासकामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवणार आहेत. या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान असणार आहे. या पहिल्या टप्पात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात सुरू होणार आहे. या अभियानात शिवसेनेचे 19 खासदार सहभागी होणार आहे. एका खासदारासोबत शिवसेनेच्या 12 पदाधिकाऱ्यांची टीम हे अभियान राबवणार आहे. अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे .
राऊतांवर विदर्भाची जबाबदारी ?
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नागपूर मनपाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते शहरातील संघटन बांधणीबाबात आढावा बैठका घेणार असून त्यातून पक्षाची सथिती समजून घेणार आहेत. यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाबेत देखील संजय राऊत चर्चा करणार आहेत. 22 ते 24 मार्च रोजी संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी 22 तारखेला ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.