आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे Vs ठाकरे:महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्याच सुप्रीम कोर्टाचा फैसला; न्यायालयीन कामकाजातही उल्लेख

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार हे निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायलयात उद्याच्या कामकाजाच्या यादीत महाराष्ट्राशी संबंधित दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकालाबाबत उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्या कुणाच्या पारड्यात निकाल जातो हे उद्या सकाळी अकरानंतर समजू शकणार आहे. याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा सकाळी अकरानंतर निकाल अपेक्षित आहे.

आजच्या सुप्रीम कोर्टातील लिस्टींगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे.

देशाला निकालाची प्रतीक्षा

सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. या निकालासाठी महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उद्या या प्रकरणी फैसला झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकारचे राजकीय भविष्य समजेल.

संध्याकाळी स्पष्ट होईल

दोन महत्वाचे निकाल उद्या लागणार आहे असे सांगण्यात आले आहे तसे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे लिस्टींग होईल. त्यातून उद्या नेमके कोणते प्रकरण कोर्ट हाताळेल हे आज सायंकाळी स्पष्ट होईल.

राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना

शिंदेंच्या शिवसेनेचे खासगार राहुल शेवाळे हे दिल्लीला तातडीने रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे व शिंदे गटाचे नेते दक्ष झाले असून दिल्लीकडे ते प्रयाण करीत आहेत.

या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

  • एकनाथ शिंदे
  • संदीपान भुमरे
  • अब्दुल सत्तार
  • तानाजी सावंत
  • संजय शिरसाट
  • यामिनी जाधव
  • चिमणराव पाटील
  • भरत गोगावले
  • लता सोनावणे
  • रमेश बोरणारे
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • महेश शिंदे
  • अनिल बाबर
  • संजय रायमुलकर
  • बालाजी कल्याणकर​

सरन्यायाधीशांचे खडेबोल:सत्तासंघर्ष प्रकरणात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक, अशा घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी

जाणून घ्या नबाम रेबिया प्रकरण?:'अरुणाचल'मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीचे संदर्भ महाराष्ट्रातील सत्तासंर्घषाच्या सुनावणीतही चर्चेत

महाराष्ट्र सत्तासंघर्ष:सातसदस्यीय पीठाची ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी

​​​​​​