आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेट्रो कारशेड वादात:राज्य सरकारद्वारे दिलेल्या जमिनीवर केंद्राने लावला आपला बोर्ड, आशीष शेलार म्हणाले - एक अहंकारी राजा प्रमाणे सरकार चालवत आहेत उद्धव ठाकरे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या संपूर्ण वादावरुन केंद्र सरकारकडून DIPT मंत्रालयाने एक पत्र राज्य सरकारला पाठवले आहे.

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. ठाकरे सरकार एकीकडे म्हणत आहे की, कांजुरमार्गमधील प्रस्तावित मेट्रो कार शेडसाठी जी जमीन उपलब्ध केली जात आहे ती, पूर्णपणे मोफत असेल. तर दुसरीकडे केंद्राकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले की, या जमिनीचा मालकी हक्क अजुनही भारत सरकारजवळ आहे. एवढेच नाही तर भारत सरकारने या जमीनीवर आपला बोर्डही लावला आहे.

दरम्यान भाजप प्रश्न उपस्थित करत आहे की, कागदपत्र न तपासता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेडला आरे जंगलाच्या या परिसरातून काढून कांजुरमार्ग येथे शिफ्ट करण्याचा निर्ण का घेतला.

केंद्राने राज्य सरकारला पत्र लिहिले
या संपूर्ण वादावरुन केंद्र सरकारकडून DIPT मंत्रालयाने एक पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. महाराष्ट्र सरकारचे चीफ सेक्रेटरी संजय कुमार यांच्यानुसार, हे पत्र त्यांनी महसूल विभागाकडे पाठवले आहे. त्यांनी दावा केला की, अजुन राज्य सरकार आपले काम थांबवणा नाही.

एका अहंकारी राजाप्रमाणे सरकार चालवत आहेत उद्धव ठाकरे : आशीष शेलार भाजपचे माजी मंत्री आशीष शेलार यांनी मंगळवारी म्हटले की, उद्धव ठाकरे सरकार हा प्रोजेक्ट अटकवणे, भटकवणे आणि लटकवण्याचे काम करत आहे. शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे एक अहंकारी राजाप्रमाणे महाराष्ट्र राज्य चालवत आहे आणि त्यांचा मुलगा एका विलासी पुत्राप्रमाणे जीवन व्यतीत करत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे काहीच चांगले होणार नाही.