आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्र सध्या शांत आहे. पण, ज्याच्यासाठी तो पेटतो त्याला जाळून खाक करून टाकतो. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला देतानाच ‘विधान परिषद निवडणूक जिंकणारच’, असा विश्वासही व्यक्त केला. अग्निपथ योजनेवर टीका करत सैन्यच भाडोत्री आणायचे असेल तर राज्यकर्तेपण भाडोत्रीच आणा, असे टीकास्त्रही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सोडले.
शिवसेनेचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (ता. १९) पवई येथील हॉटेल वेस्टइनमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. सेनेचे सर्व आमदार व मुख्य नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीत जे झाले ते झाले. मात्र शिवसेनेचे एकही मत फुटलेले नाही. या निवडणुकीत कलाकारी कोणी केली हे आपल्याला माहिती आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. आज शिवसेनेत गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाही. उद्या होणारी विधान परिषदेची निवडणूक आपण नक्कीच जिंकू.
हॉटेलमध्येच वर्धापनदिन
मुंबईत कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने वर्धापनदिन छोटेखानी करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान आहे. त्यासाठी सेनेचे सर्व आमदार पवईच्या हॉटेल वेस्टइन मध्ये आहेत. त्या आमदारांना संबोधून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.