आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचा दसरा मेळावा:उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला व्यासपीठावरून बोलणार; मात्र शिवतीर्थ ऐवजी सभागृहातून

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
  • शिवसेनेच्या डिजिटल टीमची जोरात तयारी, शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
  • 1966 पासून आजवर केवळ दोनदा खंड

शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यावर कोरोनाचे विघ्न पडले आहे. परिणामी २५ ऑक्टोबर रोजी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थऐवजी सभागृहात होणार असून शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यासपीठावरून संवाद साधणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख खुद्द मुख्यमंत्री असणे हा दुग्धशर्करा योग यंदाच्या दसरा मेळाव्याला आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यावर निर्बंध आहेत. परिणामी शिवतीर्थावर यंदा दसऱ्याला शिवसेनेची तोफ काही धडाडणार नाही. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी ऑनलाइनच संवाद साधणार आहेत पण ते चक्क व्यासपीठावरून बोलणार आहेत. त्यासाठी एका सभागृहाचा शोध चालू आहे. या सभागृहांमध्ये शिवतीर्थावर जसे व्यासपीठ असते तसे असेल. शिवसेनेचे सर्व मान्यवर व्यासपीठावर असतील आणि शिवतीर्थावर जशी ठाकरी तोफ धडाडते आणि विचाराचे सोने लुटले जाते, अगदी त्याप्रमाणे उद्धव यांचे भाषण होणार आहे. मात्र, या वेळी शिवसैनिक उपस्थित नसतील.

१९६६ पासून आजवर केवळ दोनदा खंड

व्हर्च्युअल सभेसाठी शिवसेनेची डिजिटल टीम कामाला लागली आहे. १९६६ पासून म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील शिवाजी पार्कवर (शिवतीर्थावर) शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आला आहे. यामध्ये २००६ मध्ये पावसामुळे आणि २००९ मध्ये निवडणुकीमुळे खंड पडला होता.