आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण:...उद्धव ठाकरे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल, नितेश राणेंचा निशाणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने वातावरण तापलेलं दिसतेय. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणेंकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे... तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान निलेश राणेंकडून शिवसेनेवर सातत्याने टीका होत असल्याचे पाहायला मिळते. निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला म्हटले की, 'उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे' असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाशी आदित्य यांचा संबंध असल्याचा दावा करणारे अनेक तर्कवितर्क सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप याआधीच भाजपनं अप्रत्यक्षरित्या केला होता.

बातम्या आणखी आहेत...