आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे लोक मनोरुग्ण:मुख्यमंत्र्यांची टीका; म्हणाले - हनुमान चालिसा, भोंगेवाले भाजपची ए, बी अन् सी टीम

मुंबई7 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
भाजपने पहाटे चोरासारखी शपथ घेतली - मुख्यमंत्री
 • देवेंद्र फडणवीस तुम्ही असते तर वजनाने बाबरी पडली असती, मुख्यमंत्र्यांची खोचक टीका
 • राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचा; जनतेची कामे केलीत का ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बीकेसीतील सभेत चौफेर टीका केली आहे. हनुमान चालिसा, भोंग्याचा मुद्दा, बाबरी प्रकरणी सहभाग, महागाई आणि भाजपसोबत युतीत सडलो असे म्हणत त्यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडले आहे. जर दाऊद भाजपमध्ये गेला तर हे लोक त्याला ही मंत्री करतील असा गंभीर टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपचे लोक आज दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद भाजपमध्ये आला तर हे लोक त्यालाही मंत्री करतील. मी मध्येच म्हणालो की आमचे हिंदुत्व हे गदा वाहणारे आहे, तुमच्यासारखे घंटा वाजवणारे नाही. आमचे हिंदुत्व गाढव आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. होय, आम्ही 3 वर्षांपूर्वी गाढव आमच्यापासून दूर केले. गदा उचलण्यासाठी ताकद लागते, जी फक्त शिवसेनेकडे आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनली मंचावर येताच शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले आहेत. संभाजी महाराजांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी सभेला सुरुवात केली आहे.ज्यांना इतकी वर्ष महाराष्ट्रात राहून तो समजला नाही, तो खोटा हिंदुत्वाचा मुखवटा घालणारा पक्ष देशाची दिशा भरटकवतोय असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे​

तुमचे विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही

टोपीत हिंदुत्व नसते तर टोपीखालच्या डोक्यात हिंदुत्व असते, भगवी टोपी घालून हिंदुत्व दिसत नसते. भाजपचे लोक मनोरुग्ण आहेत असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जांच्यांवर विश्वास ठेवला त्यांनी केसाने गळा कापला असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

हनुमान चालिसावाले भाजपची ए, बी, सी, टीम

हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून आणि मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. काश्मीरी पंडितांना संरक्षण नाही आणि टिनपाटांना झेड सिक्यॉरिटी देण्यात येत आहे. असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

हिंदुत्व धोतर आहे का ?

सत्ता असो वा नसो मला पर्वा नाही. माझे हिंदुत्व तकलादू नाही हे मी अनेकदा सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. हिंदुत्व सोडायला ते धोतर आहे का? आम्ही दोन्ही काँग्रेससोबत खूलेआमपणे गेलो. तुम्हीही राष्ट्रवादीसोबत सकाळच्यावेळी गेले नव्हता काय?, असेही ते यावेळी आपला हल्ला आणखी धारदार करताना म्हणाले.

मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न सुरू - मुख्यमंत्री

मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आमच्या 106 हुतात्मांनी बलिदान देऊन मुंबई एकसंघ ठेवली आहे. यासाठी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी काम केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून हा प्रयत्न सुरू आहे. असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे. बीकेसीतून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होत आहे. आपण बुलेट ट्रेन मागितली होती का? हा सर्व मुंबई तोडण्याचा प्रयत्न आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार ?

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जनसंघ अस्तित्वात होता. पण, एकदाही तो रणांगणात उतरला नाही. महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. पण, जनसंघच जागावाटपावरून या समितीतून बाहेर पडला. आता हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. आता हे मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींनी कोविडच्या मुद्यावर बैठक बोलावली व पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा म्हणाले. आहेत तर ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल, तर तुमचा भाजप तरी वाजपेयींचा राहिला आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हिंदुत्व शिवसेनेपासून दूर जाणार नाही - सुभाष देसाई

शिवसेनेवर अनेकदा आरोप झाले आहेत. मात्र शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाणार नाही ना हिंदुत्व शिवसेनेपासून दूर जाईल असे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. शिवसेनेची ताकद कराय आहे हे आज सर्वांना समजणार आहे. असे म्हणून त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

मांग कर नाही तर छीन कर असे वागा - गुलाबराव पाटील

जो जो शिवसेनेच्या अडव्यात येईल त्यांचा सत्यानाश होवो असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तर यावेळी बोलताना मांग कर नाही तर छीन कर असे वागावे लागेल असे गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना सांगितले आहे.

बाळासाहेबांना अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या - एकनाथ शिंदे

बाळासाहेबांचे हिंदुत्वासाठी असलेल्या कामामुहे त्यांनी अनेक धमक्या आल्या होत्या. यात पाकस्तानातूनही बाळासाहेब ठाकरेंना धमकी आली होती. मात्र ते घाबरले नाही. आम्ही त्यांचे शिवसैनिक अहोत आम्ही कुणालाही घाबरत नाही असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. 1992-93 ला मुंबई पेटलेली असताना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी मुंबई शांत केली. असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. अयोध्येतही असा जनसागर उसळणार असे मत एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. इतर लोकांसाठी अयोध्या फायद्याचा विषय असेजल मात्र शिवसेनेसाठी तो आत्मियतेचा आहे. शिवसेनेच्या नादाला लागू नका असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवसैनिकांमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे दिसत आहे - आदित्य ठाकरे
शिवसैनिकांमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे दिसत आहे - आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 • गो महागाई गो म्हणायची वेळ आली आहे का
 • संयम बाळगतो म्हणजे आम्ही नार्मदाची औलाद नाही
 • टीनपाटांना सुरक्षा दिली जाते
 • तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले?
 • राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
 • काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखे वाटते
 • मुन्नाभाई प्रमाणे यांनाही आपन गांधी झाल्यासारखे वाटते
 • भगव्या शाली अंगावर घेऊन फिरतात

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 • मी अयोध्येला जाताना आधी शिवनेरीवर गेलो, तेथील मुठभर माती घेऊन अयोध्येला गेलो होतो.
 • हिंदुत्वबद्दल बोलता तर महाविकास आघाडीने केला, मंदिरांचा जीर्णोद्धार. हे सुचल होत का तुम्हांला देवेंद्र जी. परंतु यांच केंद्रात सरकार बसल आहे त्यांच्या पुरातत्व खात्याने आक्षेप घेतला. अरे तुम्हीं कोण? असे तत्व नसलेली खाती पुरा आता
 • विकृत, विद्रूप, भेसूर भाजप भयानक पद्धतीने अंगावर येऊ लागला... हाच आपला मित्र होता का?`
 • केंद्र सरकार मराठीला अभिजात दर्जा आजही देत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा आहे. छत्रपती नसते तर आज तुम्ही देखील भोंग्यात बसलेले असता. त्या छत्रपतींच्या मातृभाषेला तुम्ही दर्जा देत नाही, असे करंट सरकार केंद्रात बसले आहे
 • स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण हे यांना बघवत नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ठीक नाही असे भासवले जात आहे. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला झाला हे फोटो दाखवले जातेय... पण त्या व्यक्तीला टॉमेटो सॉस कुणी दिला? किरीट सोमय्या यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोरदार टीकास्त्र!
 • पुरातत्व विभाग औरंगजेबाचे थडगे बघतोय तिकडे बोंबला.
 • लढायचे असेल तर सरळ या... मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
बातम्या आणखी आहेत...