आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धवसेनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदारांची महत्त्वाची बैठक आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. यावेळी कर्नाटक निवडणुकीत भाजपला कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धवसेनेत आणखी फाटाफूट होण्याची चर्चा सुरू झाली आहे. काही जण आमच्या संपर्कात असल्याचा दावाही शिंदेसेनेकडून होत आहे. भाजपच्या गोटातूनही उद्धवसेनेतून काही आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विस्तृत चर्चा झाली.
बैठकीत काय?
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना, नेत्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत संभाव्य फुटिरांची कानउघाडणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, फाटाफुटीचा आणि बैठकीचा काहीही संबंध नाही. आगामी विधानसभा, मनपा, जि.प. निवडणुकीसाठी कशी मोर्चेबांधणी करावी. जिल्हास्तरावर विरोधकांना कसे उत्तर द्यावे, याचे मार्गदर्शन करण्यात आल्याचा दावा उद्धवसेनेकडून होत आहे.
भाजपचे फोडाफोडीचे राजकारण
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकात भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडले नाही. जसे भाजपला कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
लवकरच जिल्हाप्रमुखांची बैठक
या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षावरील निकालाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आमदारांना निर्णयाबाबत समजावून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
इतर बातम्या
पलटवार:काँग्रेसने कर्नाटकात लांगुलचालनाचा प्रकार केला, तेच ठाकरे महाराष्ट्रात करणार; आम्ही निकराचा संघर्ष करु-आशिष शेलार
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. लांगुलचालनाचा जो प्रकार काँग्रेसने कर्नाटकात केला ती अपेक्षा संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्रात आहे. मात्र आम्ही निकराचा संघर्ष करु असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.