आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-नाशिक-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. मात्र याच जोडीने जालना आणि नांदेडमार्गे मुंबई ते हैदराबाद तसेच पुणे ते औरंगाबाददेखील हायस्पीड रेल्वेने जोडावेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रानुसार, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेडदरम्यान द्रुतगती महामार्ग सुरू करण्याचे टाकण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैदराबाद ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैदराबाद हा हायस्पीड रेल्वेमार्ग सयुक्तिक ठरेल.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा उल्लेखही नाही
विशेष म्हणजे, यापूर्वी मंजूर व सध्या जमीन अधिग्रहणामुळे प्रलंबित असलेल्या अहमदाबाद-मुंबई या नरेेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात साधा उल्लेखही केलेला नाही.
प्रकल्पामुळे हा फायदा होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिकदरम्यान हायस्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकांना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाइल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.
ऑटोमोबाइलसह उद्योग-व्यवसायांना चालना मिळणार
असा उभारता येईल प्रकल्प : मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे आणि औरंगाबाद ही शहरेदेखील हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडावीत. म्हणजे नाशिकलाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण, सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई -नाशिक-औरंगाबाद हे एकमेकांना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैदराबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणेही हायस्पीडने जोडले जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून याच मार्गांवर आधीच हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव
रेल्वे मंत्रालयाने मुंबई-नाशिक-नागपूर-आणि मुंबई-पुणे-हैदराबाद हे मार्ग हायस्पीड रेल्वेसाठी प्रस्तावित केले आहेत. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोशन लिमिटेड या कंपनीला हे काम सोपवण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ एनएचएसआरसीएलला या मार्गाचे रेखांकन अंतिम करण्यास सहकार्य मागितले आहे. १५ मार्च २०२१ ला एनएचएसआरसीएलच्या प्रतिनिधींनी नागपूर-मुंबई मार्गावरील रेखांकनाचे सादरीकरण केले. हा रेल्वे कॉरिडॉर जमिनीपासून उंचीवर राहणार असून त्यासाठी साधारण १७.५० मीटर लांब आणि रुंद जागा लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.