आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचे शिंदे गटासह भाजपवरही घणाघाती टीकास्त्र:गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही

मुंबई (शिवाजी पार्क)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबतच्या आमदारांसह भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात शिंदेंचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ‘होय, गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागण्याची हिंमत नाही. दुसऱ्याचा बाप चोरणारी अवलाद आहे ही. अरे आपल्या वडिलांना तरी घाबरा. तुम्हाला २० वर्षांनी दिघे आठवले, ते एकनिष्ठ होते.’

मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे भाषण नाही शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्य पिंजून काढणारे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण न झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. घराणेशाहीवरून शिवसेना फुटली असतानाही व्यासपीठावरील बॅनरवर मात्र बाळासाहेब, उद्धव यांच्या बरोबरीने आदित्य ठाकरे यांचेच फोटो झळकत होते.

बातम्या आणखी आहेत...