आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिथे शिवनेरी तिथे गद्दार असूच नये:शिरुरमधील काही जण ढळले, पण खरे अढळ आमच्यासोबत, उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरुरमधील काही लोक ढळली; पण जी खरी अढळ आहेत ती आपल्यासोबत आहेत. ज्या मतदार संघात शिवनेरी आहे, तिकडे राजकारणात आता गद्दार लोक असू नये. नाही तरी हा शिवनेरीचा अपमान ठरेल असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

ते मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पुणे आणि यवतमाळ येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोर्टातील लढाई असेल अथवा निवडणुक आयोगातील ती जिंकायचीच असा निर्धारही शिवसैनिकांना सांगितला.

सावध राहा अन् शिस्तीतही

ठाकरे म्हणाले, ​​​​​​दसऱ्याला थोडेच दिवस राहीले आहेत. तेथे आपली भेट होणारच आहे. वाजत- गाजत गुलाल उधळत तुम्ही येणारच आहात. मी एक विनंती करतो की, शिस्तीने या. शिस्तीतच या. कारण आपल्याकडून काही वेडं-वाकडं करून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर सावध राहा.

दोन्ही लढाया जिंकायच्याच

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला लढाई जिंकायची आहे. मग ती कोर्टाची असेल आणि निवडणूक आयोगातील असेल. माझे म्हणणे हे की, हे दोन्ही विषय वेगळे आहेत पण आम्ही जे महत्व देतो ते जनतेच्या मनाला आहे.

जनतेच्या मनातील लढाई जिंकली

ठाकरे म्हणाले, जनतेच्या मनातील जी लढाई आहे, ती आपण जिंकलेलीच आहे. आपल्यासोबत लोकांच्या ज्या भावना आहेत, त्या तशाच ठेवा. चांगल्या ठेवा, सगळ्यांना शुभेच्छा देतो.

अढळराव पाटलांवर टीकास्त्र

ठाकरे म्हणाले, शिरुरमधील काही लोक ढळली; पण जी खरी अढळ आहेत ती आपल्यासोबत आहेत. नाही तर नाव असते एक आणि करतो दुसरेच. आणि हेही खरेच आहे की, ज्या मतदार संघात शिवनेरी आहे, तिकडे राजकारणात आता गद्दार लोक असू नये. नाही तरी एक शिक्का लागला, शिक्का मारला हा शिवनेरीचा अपमान आहे.

बातम्या आणखी आहेत...