आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Uddhav Thackeray's Warning To The Rebels, Show Shiv Sena And Thackeray Live Without Using Names; His Son MP Is Speaking On Vitthal Badwa

उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा:शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा; विठ्ठल बडव्यांवर बोलणाऱ्याचा मुलगा खासदार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोर एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर तिखट हल्ला चढवला. त्यांनी प्रामुख्याने बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंवर होणारी टीका फेटाळून लावत शिंदेंना त्यांचा मुलगाही खासदार असल्याची आठवण करवून दिली.

उद्धव बंडखोरांना उद्देशून म्हणाले - 'शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा. जे विठ्ठल व बडव्यांवर बोलत आहेत, त्यांचाच मुलगा खासदार आहे. हे ते विसरले आहेत का. मी लायक नसेल तर पद सोडायला तयार आहे. मात्र, राठोडांवर आरोप होऊन देखील मी संभाळले. तरी ते गेले. माझे मुख्यमंत्रिपद मान्य नसणे, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.'

'मला सत्तेचा लोभ नाही; मेलो तरी शिवसेना सोडणार नाही असे म्हणणारेच आता पळून गेले, ' असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुनावले. मुंबईतील शिवसेना भवनात आज राज्यभरातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना, संपर्कप्रमुखांना तसेच नगरसेवकांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिसीद्वारे ऑनलाइन उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.

शिंदेंना काय नाही दिले?

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने काय दिले नाही. त्यांचा मुलगा खासदार आहे. त्यांना नगसविकास मंत्रिपद दिले. माझ्याकडे असलेली दोन खाती एकनाथ शिंदेना दिली, असे सांगताना मी रडलो नाही. ते कोरोनाचे अश्रू होते. हे सारे काही भाजपने केले आहे, त्यांची आग्राहून सुटका करावी लागणार आहे. असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.

मी जिद्द सोडली नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा कोरोना आला. त्यानंतर माझे आजारपण आले. कोण कसे वागले, यात आपल्याला जायचे नाही. मी जिद्द सोडली नाही. जिद्द अजूनही कायम आहे. मला सत्तेचा लोभ नसून, वर्षा सोडून मी मातोश्रीवर आलोय. मला वाटले सीएमपदाची खूर्ची हलतेय. मात्र, ते मानेचे दुखणे होते, असे उपरोधित वक्तव्य ठाकरेंनी केले. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेऊन बसलेले होते, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...