आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिंधे गट अकलेचे शत्रू!:शिवसेनेला हिंदुत्व, सावरकर समजवायला निघालेत; पुण्यातील आंदोलनावरून ठाकरेंनी खिल्ली उडवली

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून राज्यात राजकारण पेटलेले असतानाच आता ठाकरेंनी शिंदे गटाची थेट अक्कलच काढली आहे.

पुण्यात राहुल गांधी यांचा निषेध करताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वीर सावरकर यांच्या फोटोलाच जोडे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून ठाकरेंनी 'हे अकलेचे शत्रू, शिवसेनेला हिंदूत्व आणि सावरकर समजवायला निघालेत', अशा शब्दांत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून आक्रमक झालेल्या शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे. यात ठाकरेंनी म्हटले आहे की, मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत.

हिंदुत्वाचा गोंधळ

ठाकरेंनी पुढे म्हटले आहे की, राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय.

पुण्यात नेमके काय घडले होते?

वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, या राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी पुण्यातील सारसबागेसमोर शिंदे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील बॅनरवर एका बाजूला राहुल गांधी यांचा लाल फुली मारलेला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता. सर्वजण घोषणाबाजी करीत असताना अचानक एक महिला कार्यकर्ती पायातील जोडे काढून बॅनरवरील सावरकरांच्या फोटोला जोडे मारण्यासाठी पुढे सरसावली. महिलेची ही चूक लक्षात येताच कार्यकर्त्यांनी तातडीने महिलेला रोखले व तिची चूक दाखवून दिली. त्यामुळे ही महिला वेळीच थांबली. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायल झाला. यावरून आता ठाकरेंनी शिंदे गटाच्या या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

इतिहासाशी सर्वांचेच वैर

ठाकरेंनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले. ब्रिटिश साम्राज्याचा पाया जेवढा महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीने हलवला, तेवढाच तो सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या लढय़ामुळेही उखडला. पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावताच ‘‘तोपर्यंत तुमची सत्ता राहील काय?’’ असा भेदक प्रश्न विचारून साखळदंडात जखडलेले सावरकर अंदमानकडे निघालेल्या बोटीत चढले. हे सर्व इतिहासात नोंदवले आहे, पण इतिहासाशी वैर अलीकडे सगळय़ांनीच घेतलेले दिसते.

बातम्या आणखी आहेत...