आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता:उद्धव ठाकरेंचे भाकीत, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनो तयारीला लागा, असे आदेश शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची व विधानसभा संपर्क प्रमुखांची आज उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेनी मध्यावधी निवडणुकांबाबत भाकीत केले.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बैठकीबाबत सविस्तर माहीती दिली. अरविंद सावंत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंनी राज्यात कधीही निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त करत तयारीला लागण्याचे आदेश सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

गुजरात पॅटर्न

अरविंद सावंत यांनी सांगितले की, आपण केंद्राचे धोरण पाहीले तर राज्यात आता मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे. कारम 2014 पूर्वी हिमाचल, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांची सोबतच घोषणा केली जायची व एकाचवेळी या निवडणुका होत होत्या. 2014 नंतर मात्र यात बदल झाला. आता आधी हिमाचल विधानसभा निवडणुकीची घोषणा होते. नंतर गुजरातसाठी केंद्राकडून अनेक योजनांची घोषणा केली जाते. व त्यानंतर गुजरातच्या निवडणुका जाहीर होतात.

महाराष्ट्राला प्रलोभन

अरविंद सावंत यांनी सांगितले की, गुजरात निवडणुकांचा हा पॅटर्न आता राज्यातही अवलंबला जात आहे. पहिले महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातने पळवले. या करारांचे फक्त करार होणे बाकी होते. अशा स्थितीत हे प्रकल्प पळवले गेले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी जवळपास दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रातील जनतेला आता केंद्राकडून प्रलोभने दाखवली जात आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी गुजरात पॅटर्नप्रमाणे राज्यातही मध्यावधी निवडणुकांचे भाकीत वर्तवत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात लवकरच ठाकरेंचे दौरे

अरविंद सावंत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांचे राज्यात लवकरच दौरे सुरू होणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या उरात धडकी भरलीये. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे, त्यात आम्हालाच यश मिळणार, असा दावाही खासदार सावंत यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...