आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांवर वरवंटा कशासाठी, असा सवाल करत हे सरकार उपऱ्यांचे दलाल असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
बारसू रिफायनरी विरोधात असणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, आमची एकच भूमिका आहे जर प्रकल्पाला लाेकांचा विराेध असेल तर हा प्रकल्प कोकणात आणता कामा नये. सरकारने जी काही दडपशाही चालवली आहे. याचाच अर्थ प्रकल्पात काहीतरी काळेबेरे आहे. पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प नको, असेही ठाकरे म्हणाले.
उपऱ्यांची सुपारी घेऊन आमच्या गावच्या स्थानिकांवर वरंवटा कशासाठी फिरवताय? असा सवालही त्यांनी केला. हे उपऱ्यांचे दलाल असून जमिनी विकण्यामध्ये यांनी मलिदा खाल्ला आहे. त्या मलिद्याचे करायचे काय? तो परत द्यायला पाहिजे असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
जर मोठा प्रकल्प येणार असेल तर इथल्या भूमिपुत्राांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत का? आंबा, काजू अशी पिके असणारा असा वैभवशाली वारसा महाराष्ट्राला मिळालेला असताना त्या परिसरात उद्योगाला, पर्यटनाचा विकास आपण करत होतो. एवढा चांगला प्रकल्प असेल तर लोकांसमोर मोकळेपणाने का जात नाहीत.
मातीतल्या भूमिपुत्रांचे काय?
मोठी गुंतवणूक होणार असेल तर गावपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार का, असा सवालही त्यांनी केला. फक्त मातीची चाचपणी कशासाठी या मातीतल्या भूमिपुत्रांचेही मत लक्षात घ्या. फक्त मातीचे परीक्षण करताय. पण त्या मातीतले पुत्र कुठे आहेत असा सवालही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र पेटवू
रिफायनरीला बारसू सोलगावच्या लोकांचा विरोध असेल तर येथे प्रकल्प आणू नका. हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिलाय. जर रिफायनरी येथे आणण्यास लोकांचा विरोध असेल तर तर ती आणू नका. रिफायनरी येता कामा नये. जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत आहेत. हे चालणार नाही. ही हुकूमशाही मोडून काढू. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू, असा इशाराही ठाकरेंनी दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.