आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिफायनरीला बारसू सोलगावच्या लोकांचा विरोध असेल तर येथे प्रकल्प आणू नका. हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिलाय.
बारसू रिफायनरी विरोधात असणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज सोलगाव मधील स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे, असे स्पष्ट केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, जर नाणारला लोकांनी विरोध केला होता, तर बारसूत काय वेगळं करताय हे लोकांना दाखवा. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा हा घाट असल्याचे सांगत उद्व ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
जर रिफायनरी येथे आणण्यास लोकांचा विरोध असेल तर तर ती आणू नका. रिफायनरी येता कामा नये. जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत आहेत. हे चालणार नाही. ही हुकूमशाही मोडून काढू. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू असा इशाराही ठाकरेंनी दिला.
यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यकर्त्यांनी सुपारी घेतली असेल तर तर आम्ही कोकणची सुपारी घेतो. भांडवलदारांची सुपारी घेत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या रिफानरी विरोधाला पाठिंबा दर्शवला. आम्ही जन की बात करायला आलोय मन की बात करायला नाही, असे म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला.
३३ देशात गद्दार म्हणून ओळख
मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. या गद्दारांना महाराष्ट्रातील ३ जिल्हे देखील ओळखत नव्हते. समृद्धी महामार्ग होताना देखील मार्ग काढला अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा नष्ट होत होत्या, मी जाऊन मार्ग काढला, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कातळ शिल्पांची पाहणी
उद्धव ठाकरे यांनी बारसूतील कातळ शिल्पांची पाहणी केली. ही कातळ शिल्प रिफायनरीतील जागेत येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ही शिल्प प्रागैतिहासीक, अश्मयुगीन काळातील असणारी अशी अनेक शिल्प या पठारावर आहेत. हा महाराष्ट्रातला पुरातन वारसा जपण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.