आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेत झालेली कुचंबणा बोलून दाखवत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. २००४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बांधकाम व्यावसायिकाला तिकीट देण्यासाठी माझा पत्ता कापला जाणार होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला तिकीट मिळाले, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कीर्तिकर म्हणाले की, मी ५६ वर्षे शिवसेनेसोबत आहे. ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून मला बिरुदावली मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी २००४ मध्ये माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला. व्ही. के. सिंह नावाचा उत्तर भारतीय बिल्डर आहे. त्याचा भाऊ रमेश सिंह आहे. त्याला तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बिल्डरची गुफ्तगू सुरू होती. काय गुफ्तगू सुरू होती, मला माहीत आहे. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिले नाही. मला तिकीट दिले. केंद्रात २०१९ ला मला जेष्ठ असतानाही मंत्रिपद देण्याऐवजी अरविंद सावंत यांना दिले.
कीर्तिकर निवडून येणार नाहीत
खासदार कीर्तिकर शिंदे गटात गेल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्यांच्या जाण्याने पक्षात थोडीशी सळसळही झालेली नाही. उद्या लोक त्यांना विसरून जातील. पुढील निवडणुकीत ते निवडूनही येणार नाहीत. कीर्तिकर यांच्या बोलण्याला फारसा अर्थ उरलेला नाही. त्यांचे पूत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटासोबत राहिले आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.