आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्स तस्करीची नवीन पद्धत:सँडलमध्ये अडीच कोटी किमतीचे हेरोइन लपवून मुंबईत आलेल्या युगांडाच्या महिलेला अटक, दिल्लीत नवीन वर्षांच्या पार्टीत ड्रग्स खपवण्याची होती तयारी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेला मुंबईहून दिल्लीला जाता पकडले, ड्रग्सची किंमत अंदाचे अडीच कोटी रुपये असल्याचे समजते

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी कस्टम सेलने युगांडाच्या एका महिलेला 500 ग्रॅम हेरोइन(ड्रग्स) सोबत अटक केली. सदरील महिला हे ड्र्ग्स सँडलमध्ये लपवून युगांडाहून भारतात आली होती. हे ड्रग्स दिल्लीत नववर्षानिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी होते, असे महिलेने चौकशीदरम्यान सांगितले. ड्रग्सची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

स्कॅनिंग दरम्यान महिलेच्या सँडलमध्ये संशयित पदार्थ असल्याचे समजले
स्कॅनिंग दरम्यान महिलेच्या सँडलमध्ये संशयित पदार्थ असल्याचे समजले

कोर्टाने दोन दिवस कोठडी सुनावली

अटक केलेल्या महिलेचे नाव जेन नालुमन्सी उर्फ एमबीबाजू ओलिवर जोसली (31) असे आहे. तिला नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत अटक केली आहे. तिला विशेष NDPS न्यायलयात हजर केले असता तिला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबईहून दिल्लीला जाताना पकडले

कस्टम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिला मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसणार होती. स्कॅनिंग दरम्यान तिच्या सँडलमध्ये संशयित पदार्थ असल्याचे समजले होते. यानंतर सँडलची टाच काढली असता त्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेले ड्रग्स जप्त केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser