आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ukraine Maharashtra Arrivals | Ukraine Russia War | CSMIA To Provide Free Food, Wifi And Medical Facilities For Students Returning From Ukraine

युक्रेन युद्ध:युक्रेनवरून मुंबईत येणाऱ्या भारतीयांसाठी मोफत अन्न-पाण्यासह वायफायची सुविधा; लसीकरण, निगेटिव्ह रिपोर्ट नसली तरीही स्पॉटवर चाचण्या घेऊन मार्गदर्शन

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनवरून मायदेशी परतणाऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र सरकार आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज झाले आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI1944 ने काही भारतीय युवा आणि विद्यार्थी संध्याकाळी 8 वाजता या विमानतळावर पोहोचणार आहेत. या लोकांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणि कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र नसल्याच्या परिस्थितीतही त्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, या दरम्यान विमानतळावर एक विमानतळ आरोग्य संघटनेची (APHO) टीम उपस्थित राहणार आहे. ही टीम विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासणार आहे. येणाऱ्या प्रवाशांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल.

दोन्ही प्रमाणपत्र नसल्यास कोरोना टेस्ट

विशेष म्हणजे, या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध नसतील तर विमानतळावरतच त्यांची RT-PCR चाचणी केली जाईल. चाचणीचा संपूर्ण खर्च विमानतळाकडून केला जाईल. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना विमानतळावरून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. तसेच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कोरोना नियमांच्या आधारे पुढील प्रक्रिया केली जाईल. यासोबतच, युक्रेनवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास अधिकाधिक सोपा आणि सरल कसा होईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रयत्नशील राहील.

जेवण, पाण्यासह वायफायची मोफत सुविधा

प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, युक्रेनवरून येणाऱ्या भारतीय प्रवाशांना कुठल्याही प्रकारची समस्या होऊ दिली जाणार नाही. या प्रवाशांसाठी विमानतळावर कुंपणे लावून जागा निश्चित केली जाईल. या ठिकाणी त्यांना WiFi सह, जेवण आणि पाण्याची मोफत व्यवस्था केली जाईल. तसेच आवश्यक असल्यास मार्गदर्शन आणि वैद्यकीय सुविधा सुद्धा अगदी मोफत पुरवल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...