आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊद इब्राहिम पाकिस्तानात:'कोणत्याही परिस्थितीत दाऊदला भारतीय भूमीवर आणा', आमदार रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याची कबुली अतिरेक्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानने दिली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दाऊदला कोणत्याही परिस्थिती भारताच्या भूमित आणा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींकडे मागणी केली आहे. 'अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आहे हे पाकिस्तानने कबूल केलं आहे. तर आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागणी करतो की, दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारततीय भूमीत आणा' अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

27 वर्षांत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याची कबुली अतिरेक्यांचे आश्रयस्थान पाकिस्तानने दिली आहे. दहशतवादाच्या फंडिंगवर नजर ठेवणारी संस्था एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर येण्यासाठी पाकने 88 अतिरेकी संघटना व त्यांच्या म्होरक्यांवर कारवाईचे ढोंग केले आहे. याच यादीत दाऊदचे नाव आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser